शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:41 IST

पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पान, फूल, बुक्याच्या उधळणीत माउली भक्तांनी दर्शन घेतले.

मलटण :  पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।।            जागृती स्वप्नी पांडुरंग ।।असे म्हणत मोठ्या भक्तिमय वातावरणात  ज्ञानेश्वर महाराज पालखी आज, शुक्रवारी सकाळी तरडगावहुन फलटणकडे मार्गस्थ झाली. विठूनामाचा जयघोष करत वैष्णव भक्तांच्या भक्तीला उधान आले होते. काळजमध्ये दर्शनासाठी पालखी काही काळ थांबल्यानंतर सुरवडीच्या दिशेने निघालेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पान, फूल, बुक्याच्या उधळणीत माउली भक्तांनी दर्शन घेतले.सुरवडी येथे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव जगताप  यांनी पालखीचे स्वागत केले. या ठिकाणी माऊलींच्या पादुकांची विधिवत पूजा व आरती सुरवडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. नांदल साखरवाडी खराडेवाडी पिंपळवाडी घडगेमळा या पंचक्रोशितील लोकांनी सुरवडी येथे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.दुपारच्या न्याहरीसाठी पालखी निंभोरे येथे थांबली. याठिकाणी प्रशासनच्या उत्तम नियोजनामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला.  निंभोरे येथे मिरगाव वठार निंबाळकर पंचक्रोशितील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अडीच ते तीन तासांच्या विश्रांती नंतर पालखी वडजलकडे मार्गस्थ झाली.वडजलचे गावकरी पालखी घ्यायला निमभोर पर्यंत आले होते. वडजलहून पालखी मलटणकडे मार्गस्थ झाली. अवघे मलटण पालखीला घ्यायला वडजलमध्ये दाखल झाले होते. पालखी मार्गात रांगोळी रेखाटली होती तर काही भविकांनी फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. पालखी रथाचे आगमन होताच मलटण येथील तरुण मंडळांनी पुष्पवृष्टी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी