शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वर माउली आज घेणार सातारावासीयांचा निरोप, सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 13:20 IST

बरड मुक्कामी विसावली 

लखन नाळेवाठार निंबाळकर :‘पंढरीशी जावे ऐसे माझे मनी, विठाई जननी भेटे केव्हा...’ या उक्तीप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील चौथ्या मुक्कामासाठी रविवारी बरड गावी विसावला. वैष्णवांचा मेळा सोमवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.सोहळा वाटेवर धुळदेव, कोळकी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी गावातील ग्रामपंचायत तसेच सोसायटीचे पदाधिकारी विविध मान्यवर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत करून पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. या ठिकाणी परिसरातील विविध गावांतील भाविकांनी दर्शन घेतले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर विडणीतून पालखी सोहळा मार्गस्थ झाला.पालखी मार्गावर वडले, दुधेबावी, माझेरी, सोनवडी खुर्द, सोनवडी बुद्रुक, तिरकवाडी आदी गावांतील ग्रामस्थांनी माउलींच्या पालखीचे दर्शन घेतले. दुपारच्या जेवणासाठी पिंप्रद येथे विसावला. वाजेगाव येथे काही काळ विसावा घेऊन मार्गस्थ होऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे विसावला. बरडच्या वेशीवर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पंचायत समितीचे सदस्य, विविध सहकारी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय पदाधिकारी, श्रीराम कारखान्याच्या संचालकांनी स्वागत केले.लाखो भाविकांचा हा सोहळा सोमवारी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील प्रशासनाच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी गावच्या सीमेवर माउलीच्या पालखी सोहळ्याला निरोप देण्याचा तसेच सोलापूर जिल्ह्याच्या वतीने स्वागताचा समारंभ होणार आहे.फलटण तालुका प्रशासनात उपविभागीय अधिकारी प्रियांका अंबेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, उपअभियंता राजकुमार मठपती, शाखा अभियंता सोपान बिराजदार, ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, तालुका वैद्यकीय अधिकारी निखिल दिघे यांनी वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबविली.

उत्साहाला उधाण..पालखी सोहळ्यासाठी वीर धरणातून नीरा उजवा कालव्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून भाविकांसाठी अंघोळ व कपडे धुण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. महिलांनी घरासमोर सडा, रांगोळ्या काढून वारीत आलेल्या वारकऱ्यांना मोफत खाद्यपदार्थ तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आपापल्या परीने भोजनाची सोय उपलब्ध केली होती.