शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध !

By सचिन काकडे | Updated: August 30, 2022 20:55 IST

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सशर्त परवानगी

सातारा : गणेशोत्सवात डीजे वाजणार की नाही? याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला मंगळवारी पूर्णविराम मिळाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ध्वनिमर्यादेचे निर्बंध कायम ठेवत ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत डीजेला परवानगी देत असल्याचे जाहीर केले आहे.सातारा शहरात सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुर्घटनेनंतर डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. याचा डीजेचालकांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे यंदाच्या उत्सवात तरी डीजेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डीजे चालकांकडून केली जात होती. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील ध्वनिमर्यादेचे निर्बंध घालून डीजेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने काही झालं तरी डीजेला परवानगी नाही, अशी भूमिका घेतल्याने गणेशोत्सवात डीजे दणाणणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

अखेर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी न्यायालय व ध्वनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार डीजेला परवानगी देत असल्याचा सुधारित आदेश मंगळवारी काढला. या आदेशानुसार ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत डीजेला परवानगी देण्यात आली आहे. आवाजाची मर्यादा प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक-मालक कारवाईस पात्र ठरतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

अशी आहे ध्वनिमर्यादा...     क्षेत्र           ध्वनिमर्यादा (डेसीबलमध्ये)                    दिवसा         रात्रीऔद्योगिक क्षेत्र     ७५   ७०वाणिज्य क्षेत्र     ६५   ५५निवासी क्षेत्र     ५५   ४५शांतता क्षेत्र     ५०   ४०

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGaneshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले