जिल्ह्यात वर्षात १४९ तोळे सोने चोरीला
By Admin | Updated: May 23, 2016 00:22 IST2016-05-22T22:34:05+5:302016-05-23T00:22:37+5:30
ज्येष्ठ महिला निशाण्यावर : ३२ गुन्ह्यांत १,४५० ग्राम सोने चोरट्यांच्या खिशात
जिल्ह्यात वर्षात १४९ तोळे सोने चोरीला
घरातून चोरीला गेलेले आणि रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोने ओढून नेण्याच्या घटना वर्षभरात ३२ घडल्या आहेत. या घटनांमध्ये तब्बल १४९ तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटनांमध्ये ज्येष्ठ महिला चोरांचे लक्ष्य होत्या. सणसमारंभ म्हटलं की महिला तिजोरीतील सोने काढून ते घालून कार्यक्रमांसाठी बाहेर पडतात. यात ज्येष्ठ महिलाही आघाडीवर असतात; पण रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून जाता येईल, अशा ठिकाणी दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी चेन स्नॅचिंगच्या माध्यमातून सर्वाधिक सोने चोरून नेले आहे. याबाबत पोलिसांनी वारंवार नागरिकांना लक्षपूर्वक सुवर्णालंकार घालण्याच्या सूचनाही केल्या होत्या.