राष्ट्रीय पोषण अभियानात जिल्ह्याने उत्कृष्ट काम करावे : उदय कबुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:46+5:302021-09-04T04:46:46+5:30
सातारा : ‘राष्ट्रीय पोषण अभियानात सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट काम करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचून योग्य पोषणचा अर्थ सर्वसामान्यांना ...

राष्ट्रीय पोषण अभियानात जिल्ह्याने उत्कृष्ट काम करावे : उदय कबुले
सातारा : ‘राष्ट्रीय पोषण अभियानात सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट काम करावे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व कुटुंबांपर्यंत पोहोचून योग्य पोषणचा अर्थ सर्वसामान्यांना समजून सांगावा,’ असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी केले.
सातारा जिल्हा परिषदेमधील कार्यक्रमात अध्यक्ष कबुले बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, दीपक ढेपे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा म्हणाले, ‘राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सातारा जिल्ह्याने यापूर्वी चांगले काम केलेले आहे. तसेच यावर्षीही आपण पोषण अभियानाची सुरुवात चांगली केली आहे. त्यामध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे.’
महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी आणि राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध उपक्रमांचे नियोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने किशोरी मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ० ते ६ वयोगटातील बालके या घटकांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करून राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
फोटो दि.०३सातारा झेडपी पोषण आहार फोटो...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत पोषण आहार अभियान कार्यक्रमाला अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते आदी उपस्थित होते.
..................................................................................