जिल्हा बँकेची शनिवारी वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:27+5:302021-03-19T04:38:27+5:30
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २० मार्च २०२१ रोजी दुपारी ...

जिल्हा बँकेची शनिवारी वार्षिक सभा
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २० मार्च २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
बॅंकेने राबविल्या असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात बँकेचे मोलाचे योगदान आहे. अहवाल सालात झालेल्या नफ्यातून बॅंकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायट्या, सचिव, इत्यादी भरीव तरतूद केलेली आहे. सातारा जिल्हा बँक, बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या संचालक यांचा सभा भत्ता व बँक अधिकारी व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन अशी एकूण रक्कम रु. १६.०० लाख तसेच सन २०१९-२० च्या ढोबळ नफ्यातून रक्कम रु.१.०० कोटीचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आणि जिल्ह्यातील स्थलांतरित, मोलमजुरी करणारे मजूर/शेतमजूर व गरजू कुटुंबांना त्यांचे दैनंदिन उदरनिर्वाहासाठी जीवनावश्यक अन्नधान्याचे किट उपलब्ध करून दिले असून, यासाठी बँकने अंदाजित रु १.०० कोटी रक्कम खर्च केलेले आहेत.
बॅंकेची ऑडिट ‘अ’ वर्गाची परंपरा कायम राखली आहे. गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेस आयएसओ .९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले असून बँक यूपीआय सर्व्हरला लिंक झाल्याने ग्राहकांना फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, ई-कॉमर्स इत्यादी सर्व व्यवहार घरबसल्या काही क्षणात करता येणार आहेत. गुगल पे, फोनपे, पेटीएम, ॲमेझाॅन या प्रकारचे ॲप्लीकेशनद्वारे मोठ्या प्रमाणात जलद डिजीटल व्यवहार करता येतील. राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नामांकित अशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा लौकिक सर्वत्र झाला आहे.
अशा लौकिक प्राप्त बॅंकेच्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेच्या सर्व सभासदांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळविलेल्या सूचनांप्रमाणे उपस्थित राहावे. सभासदांना जनरल सभेस उपस्थित राहता यावे म्हणून संबंधित तालुक्याच्या विभागीय कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेस अथवा मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा. या सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.