आनंदराव चव्हाण पतसंस्थेकडून दुचाकी वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:13 IST2021-02-05T09:13:14+5:302021-02-05T09:13:14+5:30
यावेळी शाखा सल्लागार वसंतराव खंडेलवाल, शंकर पाटील, शिवाजी यादव, डॉ. अनिल शहा, शाखाप्रमुख ...

आनंदराव चव्हाण पतसंस्थेकडून दुचाकी वितरण
यावेळी शाखा सल्लागार वसंतराव खंडेलवाल, शंकर पाटील, शिवाजी यादव, डॉ. अनिल शहा, शाखाप्रमुख समीर शिकलगार, रोहित माने, सूर्यकांत काळे, हणमंत यादव उपस्थित होते.
आझाद मुलाणी म्हणाले, आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या कऱ्हाड येथील शाखेने अल्पावधीतच लोकांचा विश्वास संपादन करून आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळेच दिवसेंदिवस लोकांचा संस्थेकडे कल वाढला आहे.
समीर शिकलगार म्हणाले, कऱ्हाड शाखेच्या माध्यमातून सभासदांना विविध ठेव योजना, कर्ज आदी सुविधा देण्यात येत आहेत. संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल सुरू आहे.
रोहित माने यांनी स्वागत केले. तर सूर्यकांत काळे यांनी आभार मानले. (वा. प्र.)