राज्यस्तरीय मर्दानी आडाखा पुरस्काराचे आज बोराटे यांना वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST2021-02-05T09:07:10+5:302021-02-05T09:07:10+5:30

पेट्री : छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष आयोजक वस्ताद अमित गडांकुश राष्ट्रीययोद्धा पुरस्कृत ...

Distribution of State Level Men's Adakha Award to Borate today | राज्यस्तरीय मर्दानी आडाखा पुरस्काराचे आज बोराटे यांना वितरण

राज्यस्तरीय मर्दानी आडाखा पुरस्काराचे आज बोराटे यांना वितरण

पेट्री : छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष आयोजक वस्ताद अमित गडांकुश राष्ट्रीययोद्धा पुरस्कृत राज्यस्तरीय मर्दानी आखाडा पुरस्कार माळेवाडी (ता. सातारा) येथील किरण बोराटे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. ३१ रोजी सहायक पोलीस आयुक्त अशोक नाईक यांच्याहस्ते कोपरखैरणे, नवी मुंबई येथे होणार आहे.

किरण बोराटे यांनी सातारा येथे २०१० पासून शौर्य शिवकालीन मर्दानी आखाडा सुरू केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ मध्ये पहिली महाराष्ट्र राज्य मर्दानी स्पोर्टस‌् अजिंक्य स्पर्धेत सातारा जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये २५ विद्यार्थी सुवर्णपदक, दहा विद्यार्थी रजत पदक, तर १५ विद्यार्थ्यांना कास्य पदक मिळाले आहे. आखाडा शालेय स्पर्धा २०१९ यामध्ये २५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यातील जिल्हास्तरीय स्पर्धेत १८ विद्यार्थी गोल्ड मेडल प्राप्त करून विभागस्तरावर गेले. या कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात येणार आहे.

Web Title: Distribution of State Level Men's Adakha Award to Borate today