तारळे येथील शाळेत साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST2021-08-20T04:44:54+5:302021-08-20T04:44:54+5:30
कऱ्हाड : तारळे (ता. पाटण) येथे शिवसेनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावतीने विभागातील विद्यार्थ्यांना ...

तारळे येथील शाळेत साहित्याचे वाटप
कऱ्हाड : तारळे (ता. पाटण) येथे शिवसेनेच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावतीने विभागातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप झाले. शिवदौलत बँकेचे संचालक अभिजित पाटील, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, माजी सरपंच गजानन जाधव, माजी उपसरपंच विकास जाधव, माणिक पवार, श्रीकांत सोनावले, अशोक जगधने, दिनकर सावंत, विश्वास खांडके, विशाल पाटील, शरद शिंदे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
कातकरी कुटुंबांना खावटी अनुदान वाटप
कऱ्हाड : तारळे (ता. पाटण) ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या कातकरी वस्तीत शासनाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्पमार्फत खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले. तसेच बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले. आदिवासी विभागाचे अधिकारी रामदास सोनफुले, सरपंच बंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य गौरव परदेशी, रामचंद्र देशमुख, किरण सोनवले, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण थोरात आदी उपस्थित होते. सुमारे ३१ कुटुंबांना हे अनुदान वाटप करण्यात आले.
वीज खांबावर वाढलेल्या वेली हटवल्या
कऱ्हाड : कृष्णा कारखाना ते शेणोली स्टेशन रस्त्यावरील विजेच्या खांबावर वाढलेल्या वेली महावितरण कर्मचाऱ्यांनी तात्काळ हटवल्या. रेठरे बुद्रुक येथून कृष्णा कारखाना ते शेणोली जाणाऱ्या रस्त्याकडेच्या विजेच्या खांबांवर वेली वाढल्या होत्या. पावसामुळे त्याची चांगलीच वाढ झाली होती. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना शॉक लागण्याचा धोका निर्माण झाला होता. दुर्घटना घडण्यापूर्वी याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेत तातडीने परिसरातील झाडे झुडपे हटवली असून, वीज खांबावर वाढलेल्या वेली हटवल्या आहेत.
वैभवी जगताप हिचा प्राचार्यांकडून सत्कार
कऱ्हाड : येथील गाडगे महाराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैभवी विजयानंद जगताप हिने बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून ९८.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने यांच्याहस्ते तिचा सत्कार करण्यात आला. ग्रीन पॉवर शुगर लिमिटेड, गोपुजचे संग्राम देशमुख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.