तांबवेत शालेय साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:45 IST2021-08-18T04:45:49+5:302021-08-18T04:45:49+5:30
तांबवे ग्रामपंचायत आवारात सरपंच शोभाताई शिंदे, जिल्हा परिषद शाळेत सैन्यदलातील जवान भूषण पाटील, स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयात यशवंत ...

तांबवेत शालेय साहित्याचे वाटप
तांबवे ग्रामपंचायत आवारात सरपंच शोभाताई शिंदे, जिल्हा परिषद शाळेत सैन्यदलातील जवान भूषण पाटील, स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयात यशवंत एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शंकरराव पाटील, ग्रामविकास सोसायटीत अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ग्रुप सोसायटीत अध्यक्ष भिकाजी पाटील, दक्षिण तांबवेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवान दत्तात्रय चोपदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तांबवे ग्रामपंचायतीच्या वतीने दहावीतील विद्यार्थी पूर्वा आनंदा यादव, ज्ञानेश्वरी प्रकाश सुतार, समृद्धी सुनील फिरंगे, आर्या आनंदा चव्हाण, मधुरा दत्तात्रय वीर, प्रणाली संजीव पाटील, सृष्टी विकास खडंग, दीपाली भगवान साठे, निकिता सुनील पवार, वेदांती विठ्ठल पाटील, वैष्णवी दीपक पाटील या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
फोटो : १७केआरडी०३
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाड येथे उपसरपंच अॅड.विजयसिंह पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.