आपत्तीग्रस्तांना शिधा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:09+5:302021-08-28T04:43:09+5:30
दहिवडी कोरोनामुळे आपत्तीग्रस्त झालेल्या माण तालुक्यातील वीस गावांमधील अठ्ठ्याऐंशी कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. एचडीएफसी बँक परिवर्तन व ...

आपत्तीग्रस्तांना शिधा वाटप
दहिवडी
कोरोनामुळे आपत्तीग्रस्त झालेल्या माण तालुक्यातील वीस गावांमधील अठ्ठ्याऐंशी कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आले. एचडीएफसी बँक परिवर्तन व अफार्म संस्थेतर्फे हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्पअंतर्गत एचडीएफसी बँकेने पुरस्कृत केलेल्या गावांमध्ये अफार्म संस्थेच्या माध्यमातून काम सुरू आहे. हे काम सुरू असताना संबंधित गावातील ग्रामस्थांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. त्यावेळी कोविड-१९ रोगामुळे अनेकांना आर्थिक तसेच इतर अडचणींना सामोरे जावे लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर कुटुंबांना मदत म्हणून शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात प्रत्येक कुटुंबास गहू, साखर, हरभरा डाळ, तेल, चटणी, मीठ, चहा पावडर, हळद आदी वस्तू देण्यात आल्या.
हे शिधा वाटप नायब तहसीलदार विलास करे यांच्याहस्ते व विस्तार अधिकारी एम. एस. अडागळे, एचडीएफसी बँक, वडूज शाखा व्यवस्थापक गौरव फडतरे, ज्ञानेश्वर लिंबापुरे, ओमप्रकाश पैठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अफार्म संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक दिनेश गुप्ता व प्रकल्पातील संपूर्ण टीम उपस्थित होती.