चित्रकला, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:29+5:302021-01-08T06:05:29+5:30

मायणी : येथील वनवैभव आणि पक्षी आश्रयस्थानाचा परिचय अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा, या उद्देशाने ‘पक्षी सप्ताहाचे’ औचित्य साधून मायणी वनविभाग ...

Distribution of prizes to the winners of painting and essay competitions | चित्रकला, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

चित्रकला, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

मायणी : येथील वनवैभव आणि पक्षी आश्रयस्थानाचा परिचय अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा, या उद्देशाने ‘पक्षी सप्ताहाचे’ औचित्य साधून मायणी वनविभाग व फ्रेंड्स ग्रुप मायणी यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा आवडता पक्षी’ , सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मायणी पक्षी आश्रयस्थानात मी पाहिलेला पक्षी’ हे चित्रकला स्पर्धेसाठी विषयतर निबंध लेखन स्पर्धेसाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा आवडता पक्षी’ आणि सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझा मायणी पक्षी आश्रयस्थानातील अनुभव’हे विषय देण्यात आले होते.

प्रथम, द्वितीय तर तृतीय बक्षीस ठेवण्यात आले होते. पहिली ते पाचवी निबंध स्पर्धा शौर्य फडतरे, भांडेवाडी (ता. खटाव) प्रथम, वेदिका काबुगडे, मायणी (ता. खटाव) द्वितीय, श्रेयस खरात (सातारा), तृतीय क्रमांक चित्रकला स्पर्धात आशुतोष फडणीस (सातारा) प्रथम संग्रामसिंह चव्हाण मायणी (ता. खटाव) द्वितीय, केदारचन्ने मायणी (ता. खटाव) तृतीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धात वैशाली भोसले, वरकुटे-मलवडी (ता. माण) प्रथम, प्रिया कुदळे, शिरसवडी (ता. खटाव) द्वितीय, श्रेयस देशमुख मायणी (ता. खटाव) तृतीय तर चित्रकला स्पर्धा जतीन भिसे, सातारा, प्रथम, सारा सय्यद लोणंद (ता. खंडाळा), द्वितीय तर विश्वजित फाळके मायणी (ता. खटाव) तृतीय क्रमांक मिळविला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मायणी विभागाच्या वन मंडलाधिकारी संजीवनी खाडे, मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष महेश जाधव, डॉ. विकास देशमुख, धैर्यशील चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश सुरमुख, फ्रेंड्स ग्रुप सदस्य व वन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच इतर विजेत्यांना ऑनलाईन पद्धतीने बक्षीस रक्कम पाठवण्यात येणार आहे.

04मायणी

चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना वन मंडलाधिकारी संजीवनी खाडे, पोलीस पाटील प्रशांत कोळी आदी उपस्थित होते. (छाया :संदीप कुंभार)

Web Title: Distribution of prizes to the winners of painting and essay competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.