मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप
By Admin | Updated: November 14, 2014 23:16 IST2014-11-14T22:27:10+5:302014-11-14T23:16:47+5:30
मितेश घट्टे : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य अलौकिक

मूकबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांचे वाटप
पाटण : ‘समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भेदभाव दूर करण्याबरोबरच समाजाला डोळस बनविण्याचे कार्य संतांनी केले आहे. आज हेच कार्य श्री समर्थ बैठक व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक व निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत. अध्यात्माची सांगड घालत मनामनात सामाजिक जाणीव चेतविण्याचे त्यांचे कार्य अलौकिक आहे,’ असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) तर्फे पाटण येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मूकबधिर विद्यालयातील मुलांना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रांताधिकारी संजीव जाधव, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक विकास धस, गटशिक्षणाधिकारी विलास भागवत, डॉ. मुबीन संदे, गणेश पिसाळ आदी उपस्थित होते. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन धर्माधिकारी व उमेश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोफत श्रवणयंत्र वाटपप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी संजीव जाधव, तहसीलदार रवींद्र सबनीस व मान्यवर.