शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 16:03 IST

watershortege satara-खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देमायणी प्रादेशिक नळपाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित तीन कोटींची थकबाकी : ग्रामस्थांनी कर भरुन सहकार्य करण्याचे आवाहन

मायणी : खटाव तालुक्यातील येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होत असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे वीज कंपनीने या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तोंडावर मायणीसह पश्चिम-उत्तर काही भागातील ग्रामस्थांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.याबाबत माहिती अशी की, येरळवाडी येथील मध्यम प्रकल्पातून मायणी परिसरातील मायणीसह चितळी, गुंडेवाडी, मोराळे, व मरडवाक या पाच गावांसाठी पिण्याचे पाणी मिळण्यासाठी मायणी प्रादेशिक नळ पाणी परवठा योजना सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना सुरू केल्यापासून विविध कारणांमुळे ही योजना सतत बंद राहत होती.

दोन वर्षांपूर्वी या योजनेचे मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने व लहान गावांना योजना न परवडणारी असल्याने चितळी मोराळे गुंडेवाडी व मरडवाक या चार गावांनी या योजनेतील आपला सहभाग काढून घेतला. तेव्हापासून केवळ मायणी गावासाठी ही योजना कार्यान्वित होती. मात्र या योजनेवर असलेली शंभर हाऊस पॉवरची मोटर व त्याचे येणारे लाईट बील व मायणी गावासही न परवडणारे आहे.या योजनेचे थकीत वीज बिल ३ कोटी १२ लाखाचा आसपास गेले आहे. चार-पाच दिवसांपूर्वी मायणी ग्रामपंचायतीकडून संबंधित विभागास दोन लाख रुपये थकीत बिलापोटी भरले होते. मात्र थकबाकीची रक्कम मोठी असल्याने दोन लाख भरल्यानंतर ही संबंधित विभागाने अधिक पैसे भरण्याची मागणी करत योजनेचा पुरवठा खंडित केला. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मायणीच्या पश्चिम व उत्तर भागातील लक्ष्मीनगर, सराटे मळा, चांदणी चौक परिसर मोराळे रोड मरडवाक रोड कचरेवाडीतील काही भाग या ठिकाणी या ठिकाणातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून वीजपुरवठा सुरळीत करून ऐन उन्हाळ्यात पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.पर्यायी व्यवस्थाही अशक्यसुमारे तीन कोटी रुपये प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे बील थकल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. गत दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने थोडी रक्कम भरली आहे. तसेच नवीन योजना किंवा इतर पर्यायी व्यवस्था लगेच बघणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी आपला थकित घरफळा व पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच सचिन गुदगे यांनी केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर