सातारा : सातारा जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ६५ गट आणि पंचायत समितीच्या १३० गणांचा प्रारूप आराखडा सोमवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये काही तालुक्यांतील गट आणि गणांत मोडतोड झाली असून नावेही बदलली आहेत. काही ठिकाणी गावांची अदलाबदलही झाली आहे. त्यामुळे खटाव, फलटण आणि काेरेगाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दाेन गट वाढले आहेत. यावर २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची प्रभाग रचना प्रसिद्ध केली. यामध्ये बहुतांशी जुन्या गटांची आणि गणांची नावे जैसे थेच आहेत. पण, काही ठिकाणी बदल झाला आहे. तसेच खटाव, कोरेगाव आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी एक गट आणि दोन गण वाढलेत. यामुळे या तालुक्यात पूर्वीच्या गट आणि गणात मोडतोड झाली आहे. काही गावे दुसरीकडे, तसेच नवीन गट-गणात जोडण्यात आली आहेत.तसेच याच तालुक्यात नवीन गट आणि गण निर्माण झालेत. त्यातील काही पूर्वीचे गट होते. या प्रारूप रचनेवर २१ जुलैपर्यंत आलेल्या हरकतीवर विभागीय आयुक्तांसमोर प्रत्यक्षात सुनावणी होणार आहे.
तालुकानिहाय गट अन् गण..कऱ्हाडगट - गणपाल - पाल, चरेगावउंब्रज - उंब्रज, तळबीडमसूर - मसूर, वडोली भिकेश्वरकोपर्डे हवेली - कोपर्डे हवेली, वाघेरीसैदापूर - सैदापूर, हजारमाचीवारुंजी - वारुंजी, कोयना वसाहततांबवे - तांबवे, सुपनेविंग - विंग, कोळेकार्वे - कार्वे, गोळेश्वररेठरे बुद्रुक - रेठरे बुद्रुक, शेरेकाले - काले, कालवडेयेळगाव - येळगाव, सवादे
सातारापाटखळ - पाटखळ, शिवथरलिंब - लिंब, कोंडवेखेड - खेड, क्षेत्र माहुलीकोडोली - कोडोली, संभाजीनगरकारी - कारी, परळीशेंद्रे - शेंद्रे, निनामवर्णे - वर्णे, अपशिंगेनागठाणे - नागठाणे, अतित
खटावबुध - बुध, डिस्कळपुसेगाव - पुसेगाव, खटावकातरखटाव - कातरखटाव, दरुजनिमसोड - निमसोड, गुरसाळेऔंध - औंध, सिद्धेश्वर कुरोलीम्हासुर्णे - म्हासुर्णे, पुसेसावळीमायणी - मायणी, कलेढोण
फलटणतरडगाव - तरडगाव, पाडेगावसाखरवाडी पिंपळवाडी- साखरवाडी पिंपळवाडी, सस्तेवाडीविडणी - विडणी, सांगवीगणवरे - गुणवरे, आसूबरड - बरड, दुधेबावीकोळकी - कोळकी, जाधववाडी (फ)वाठार निंबाळकर - वाठार निं., सुरवडीहिंगणगाव - हिंगणगाव, सासवड
खंडाळाशिरवळ - शिरवळ, पळशीभादे - भादे, नायगावखेड बुद्रुक - खेड, बावडा
जावळीकुसुंबी - कुसुंबी, आंबेघरकुडाळ - कुडाळ, सायगावम्हसवे - म्हसवे, खर्शी बारामुरे
माणआंधळी - आंधळी, मलवडीबिदाल - बिदाल, वावरहिरेमार्डी - मार्डी, वरकुटे म्हसवडगोंदवले बुद्रुक - गोंदवले बुद्रुक, पळशीकुकुडवाड - कुकुडवाड, वरकुटे मलवडी
कोरेगावपिंपोडे बुद्रुक - पिंपोडे बुद्रुक, सोनकेवाठार स्टेशन - वाठार स्टेशन, अंबवडे सं. वाघोलीसातारारोड - सातारारोड, किन्हईकुमठे - कुमठे, ल्हासुर्णेएकंबे - एकंबे, सापवाठार किरोली - वाठार किरोली, आर्वी
महाबळेश्वरतळदेव - तळदेव, कुंभरोशीभिलार - भिलार, मेटगुताड
पाटणगोकुळ तर्फ हेळवाक - गोकुळ, कामगरगावतारळे - तारळे, मुरुडम्हावशी - म्हावशी, चाफळमल्हारपेठ - मल्हारपेठ, नाडेमारुल हवेली - मारुल हवेली, नाटोशीमंद्रूळ कोळे - मंद्रूळ कोळे, सणबूरकाळगाव - काळगाव, कुंभारगाव
वाईयशवंतनगर - यशवंतनगर, अभेपुरीबावधन - बावधन, शेंदूरजणेओझर्डे - ओझर्डे, केंजळभुईंज - भुईंज, पाचवड