खटावमध्ये ग्रामपंचायतींकडून निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:40 AM2021-05-09T04:40:16+5:302021-05-09T04:40:16+5:30

खटाव : कोरोनाची साखळी खटावमध्ये अधिकच वाढत असून, वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खटावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने ...

Disinfection by Gram Panchayats in Khatav | खटावमध्ये ग्रामपंचायतींकडून निर्जंतुकीकरण

खटावमध्ये ग्रामपंचायतींकडून निर्जंतुकीकरण

Next

खटाव : कोरोनाची साखळी खटावमध्ये अधिकच वाढत असून, वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खटावमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने औषधांची फवारणी करण्यात आली, तसेच ज्या परिसरात व वॉर्डामध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक सापडत आहेत तो परिसर निर्जंतुक करण्यात येत आहे.

गावात हॉटस्पॉट बनू लागलेल्या परिसरासह संपूर्ण गावात प्रत्येक वॉर्डामधील मुख्य रस्त्यावर, गावातील अंतर्गत रस्ते, अडगळीचा परिसर व लोकवस्तीच्या ठिकाणी ही फवारणी करण्यात येत आहे. कोरोनाबधित असलेल्या घराशेजारी व परिसरातून ही फवारणी करण्यात येत आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेत ग्रामपंचायतीच्या वतीने ही उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी मात्र घरातच राहून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सहकार्य करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख यांनी केले आहे.

०८खटाव

कॅप्शन : खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणीस सुरुवात केली.

Web Title: Disinfection by Gram Panchayats in Khatav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.