साखर कारखानदारीसमोरील प्रश्नांसंदर्भात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:16+5:302021-03-19T04:38:16+5:30
सातारा : सहकारी साखर कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ...

साखर कारखानदारीसमोरील प्रश्नांसंदर्भात चर्चा
सातारा : सहकारी साखर कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व संचालक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी भेट घेतली. साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे आमदार व खासदारांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली.
साखर कारखानदारीच्या प्रश्नांसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या आमदार व खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत साखर कारखान्यांना भेडसावत असलेल्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. केंद्रस्तरावरून साखर कारखानदारांना मदत व्हावी, यासाठी या भेटीचे प्रयोजन होते, असे बोलले जात आहे.
यावेळी आ. देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. तर साखर कारखानदारीचा अभ्यास असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व संचालक आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी कारखानदारीला भेडसावत असलेल्या विविध प्रश्नांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, पंकजा मुंडे, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, राहुल कूल, पृथ्वीराज देशमुख यांच्यासह साखर कारखानदारीशी संबंधित असलेले आमदार व खासदार उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीच्याविरोधात भाजपने मोट बांधली आहे. माजी मुख्यमंत्री आ. देवेंद्र फडणवीस दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासमवेत भाजपचे आमदार व खासदार उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्या आहेत.