मलकापुरात हरकतदारांशी चर्चा
By Admin | Updated: August 11, 2015 00:07 IST2015-08-11T00:07:31+5:302015-08-11T00:07:31+5:30
शहर विकास आराखडा : पहिल्या दिवशी २८८ अर्जांवर शांततेने सुनावणी

मलकापुरात हरकतदारांशी चर्चा
मलकापूर : मलकापूर शहरविकास आराखड्याच्या शासनाने कलम ३१ प्रमाणे तयार केलेल्या नकाशावरील दाखल हरकतींवर सोमवारी सुनावणीस प्रारंभ झाला. दाखल ६४४ हरकतींपैकी पहिल्याच दिवशी २८८ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाली. हरकतदारांच्या बरोबर अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करून शांततेत म्हणणे ऐकून घेतले.
मलकापूर येथे शहरविकास आरखड्याच्या शासनाने कलम ३१ प्रमाणे सुधारित नकाशा तयार केला आहे. नगरपंचात कार्यालयात नागरिकांना पाहण्यासाठी खुला केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना व मिळकतदारांना त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यसाठी २० जुलै अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीत हरकती व सूचना अशा एकूण ६४४ हरकती दाखल झाल्या होत्या. त्या हरकतींवर सोमवार, दि. १० रोजी सुनावणी घेण्यात आली. तसेच मंगळवारी ही घेण्यात येणार आहे. सोमवारी पहिल्या दिवशी एकूण २२९ हरकतींवर अधिकारी व हरकतदारांनी सविस्तर चर्चा करून बधितांचे म्हणणे अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. शांततेत चर्चा होऊन पहिल्याच दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत सुनावणी सुरू होती.
सुनावणीसाठी शासकीय अधिकारी नगररचना पुणे विभागाचे सहसंचालक प्र. ग. गुप्ते, सहायक नगररचनाकार एन. आर. सावंत, नगररचनाकार एस. डी. पासलकर, एच. ए. मुलाणी या अधिकाऱ्यांसह मुख्याधिकारी राजेंद्र तेली, नगरअभियंता ए. पी. मोहिते, मुख्य लिपिक नामदेव साळुंखे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
ढिगारा पोखरला
गेल्या दोन वर्षांपूर्वी मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करण्यात आला. या वाळूवजा गाळाचा ढिगारा पांढरा समुद्रकिनाऱ्यावरच करून ठेवण्यात आला आहे. त्या ढिगाऱ्यातील निम्मी वाळू मेरिटाईम बोर्डाला विकत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित निम्म्या ढिगाऱ्यालाही वाळूमाफियांनी पोखरले आहे. या ढिगाऱ्याशेजारीच असलेल्या वाळूच्या दुसऱ्या ढिगाऱ्यातही वाळू चोरीमुळे बोगदे तयार झाले आहेत. मिरकरवाडाच्या दिशेने किनाऱ्यावरील वाळूही खणल्याचे दिसून येत आहे. हे उत्खनन व वाळूचोरी सुरूच राहिल्यास काही काळाने पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावरही करोडो रुपये खर्चून धूपबंधारा बांधावा लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.