शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून ५० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग, दरवाजे पावणे दहा फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 14:08 IST

Rain Sarara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणे दहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८५१४ तर पायथा वीजगृहमधून २१०० असा मिळून ५०६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

ठळक मुद्देकोयनेतून ५० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग, दरवाजे पावणे दहा फुटांवर महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणे दहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८५१४ तर पायथा वीजगृहमधून २१०० असा मिळून ५०६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता.

जिल्ह्यात सध्यस्थिती पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मागील आठवड्यात पश्चिम भागात धो-धो पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात पावसाने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे कोयना धरणासह अन्य प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.

अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्या वर पोहोचला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सहा दराजातून विसर्ग सुरू करण्यात आला.शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास कोयना धरणात ८९.०७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर २०९८३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर, धरणाचे सहा दरवाजे गुरुवारी सायंकाळपासून पावणे दहा फुटांवर होते.

शुक्रवारी सकाळीही दरवाजे पावणे दहा फुटांवरच स्थिर होते. दरवाजातून ४८५१४ असा एकूण ५०६१४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयनेतून सुरू होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.शुक्रवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४० मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३०४७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला ३८ आणि जूनपासून आतापर्यंत ३८५८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७७ आणि आतापर्यंत ३९५८ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.शुक्रवारी सकाळचा धरणांतील विसर्ग धोम धरणातून ६२२७ क्यूसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ५५६०, बलकवडी ३९८, उरमोडी १९८६ आणि तारळी धरणातून १७१२ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७२.६४ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८३.८५, बलकवडी ८२.१३, उरमोडी धरण ७२.८४ आणि तारळी धरणात ८५.८५ टक्के साठा झाला होता.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRainपाऊसSatara areaसातारा परिसर