शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Rain: कऱ्हाडला आपत्ती निवारण पथक दाखल, व्यवस्थापन कक्षही चोवीस तास सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:23 IST

गतवर्षी ओढवलेली परिस्थिती पाहता यंदा प्रशासन पावसाळ्याच्या सुरूवातीलाच सज्ज झाले आहे.

कऱ्हाड : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात पावसाने जोर धरल्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्ती निवारण दल  कऱ्हाडात दाखल झाले आहे. एका अधिकाऱ्यांसह अठरा जवानांचा सहभाग असलेल्या या पथकाने कऱ्हाडात तळ ठोकला असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षही सज्ज केला आहे.गतवर्षीच्या भुस्खलन आणि पुराच्या आठवणी आजही ताज्या आहेत. पाटण तालुक्यात गतवर्षी २३ जुलैच्या रात्री मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले होते. त्यामुळे पाच ते सहा गावे दरडींखाली गाडली गेली. काहीजणांचा मृत्यू झाला तर अनेकजण त्या दरडींखाली दबले गेल्यामुळे जखमी झाले. संबंधितांना वेळेत मदतही मिळाली नाही. तसेच पाटण व कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापूर आला होता. गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. तेथील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करताना प्रशासनाची दमछाक झाली होती. गतवर्षी ओढवलेली ही परिस्थिती पाहता यंदा प्रशासन पावसाळ्याच्या सुरूवातीलाच सज्ज झाले आहे.कऱ्हाडातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सतर्क ठेवण्यात आला असून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातच संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बुधवारी कऱ्हाडात हाडात दाखल झाले आहे. या दलात एका अधिकाऱ्यांसह सतरा जवानांचा सहभाग आहे. आवश्यकता वाटेल त्याठिकाणी तातडीने हे पथक पाठविले जाणार असून सध्या कऱ्हाडातच या पथकाने तळ ठोकला आहे. तसेच आवश्यक बोटी, जॅकेटही जवानांना पुरविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडRainपाऊस