शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा

By सचिन काकडे | Updated: April 26, 2023 15:41 IST

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर

सातारा : सातारा शहराच्या पश्चिम भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सलग तीन आठवडे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील रहिवाशांनी बुधवारी सकाळी पालिकेत येऊन बोंबाबोंब आंदोलन केले. नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास सहा मे रोजी अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजू, असा इशारा यावेळी नगर विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.गेल्या महिनाभरापासून सातारा शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातचशहराच्या पश्चिम भागात वारंवार गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न बनला आहे.वारंवार सूचना, निवेदने देऊन पाणीपुरवठ्यात कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी नगर विकास आघाडीचे माजी नगरसेवक अविनाश कदम,  पक्षप्रतोद अमोल मोहिते यांच्यासह रामाचा गोट, मंगळवार पेठ, होलार गल्ली भागातील नागरिकांनी पालिकेत  मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासमोर प्रश्नांची सरबत्ती केली.यावेळी शहर अभियंता दिलीप चित्रे यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, फिल्टर बेडची स्वच्छता केल्यानंतर पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावी लागते. या पावडरमुळे पाण्याचा रंग काहीसा पिवळसर होतो. याचा अर्थ ते पाणी दूषित आहे असे नाही. असे सांगत त्यांनी समोरच्या बाटलीतील पिवळसर पाणी नागरिकांना पिऊनच दाखवले. यानंतर नागरिकांचा विरोध शांत झाला.दरम्यान, पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा सहा मे रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा अविनाश कदम यांनी दिला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीagitationआंदोलन