मंडई परिसरात घाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:17 IST2021-02-05T09:17:50+5:302021-02-05T09:17:50+5:30
.................. रस्त्याची चाळण सातारा : चारभिंती ते शाहूनगर येथील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. ...

मंडई परिसरात घाण
..................
रस्त्याची चाळण
सातारा : चारभिंती ते शाहूनगर येथील रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. चारभिंतीजवळ वळणावरच खड्डे पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
...........................................
धुळीमुळे अपघात
सातारा : साताऱ्यातील अनेक मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माती वर आली आहे. त्यातूनच वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अनेक भागात धुळीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहने चालविताना डोळ्यात धूळ जात असल्याने वाहने चालविणे अवघड होत आहे.
.............
वाहतूक पोलिसांची गरज
सातारा : शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता, होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांची आवश्यकता आहे. नागरिकांतून वारंवार याबाबत मागणी होत आहे; मात्र वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शहरातील पाचशे एक पाटी, विसावा नाका, बस स्टँड परिसरात नेहमी वाहतूक कोंडी होत आहे.
..............................
गर्दीत मास्कचा वापर
सातारा : सातारा शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र त्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून असंख्य सूज्ञ नागरिक मास्कचा वापर करत आहेत. मात्र, अनेक कापड विक्रेते मात्र मास्कचा नीट वापर करत नाहीत किंवा नाकाच्या खाली हनुवटीजवळ मास्क घेत असतात.
............................
धोका आणखी वाढला
सातारा : कोरोनाचा धोका वाढला होता. जिल्ह्याच्या विविध भागात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे मास्क वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एखादीच व्यक्ती मास्क हनुवटीला लावत आहे. पण पोलीस समोर येताच तत्काळ हनुवटीवरील मास्क तोंडाला लावला जात आहे.
..............................
पाण्याचा अपव्यय
सातारा : शहराच्या अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र त्याची सातारकरांना किमत नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. पालिकेकडून उन्हाळ्यात पाण्याची कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याची बचत करण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी.
.....................
बसस्थानकांमध्ये गर्दी
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. ग्रामीण भागातून खरेदीसाठी लोक साताऱ्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसस्थानकात गर्दी वाढत आहे. महामंडळाने गाड्या सुरू केल्या असल्या तरी फेऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे
................................
नागरिकांना चिलटांचा त्रास
कोरेगाव : सूर्याचा पारा वाढत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता चिलटांनीही पिडून काढले आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात असले तरी एका हाताने चिलटे हाकलण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नागरिकांनी यासाठी विविध घरगुती उपायांचा आसराही घेतला आहे. पण त्याचा उपयोग होत नाही.
....................................
मोकाट जनावरांचा त्रास
खंडाळा : खंडाळ्यात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून, अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
.......................................
आळजापूरमध्ये औषधी वनस्पतींची लागवड
आदर्की : फलटण तालुक्यातील आळजापूर येथे दिलीप नलवडे व रमेश नलवडे यांनी माळरानावर ठिबक सिंचनद्वारे दहा एकर फळबाग लागवड केली व सर्व बांधावर औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत काळे यांनी भेट देऊन नलवडे बंधूंचे कौतुक केले.
दिलीप नलवडे यांनी आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, शेवगा, डाळिंब, पेरू आदी फळबागा व औषधी, जंगली वृक्षांची लागवड, व्यवस्थापन व येणाऱ्या अडचणी, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आदीची माहिती जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी माहिती घेऊन मार्गदर्शन केले.
फोटो
३१आदर्की