लस पुरवठ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:38 IST2021-05-10T04:38:40+5:302021-05-10T04:38:40+5:30
नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. राज्यात सर्वाधिक प्रकोप सध्याच्या ...

लस पुरवठ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे
नगराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. राज्यात सर्वाधिक प्रकोप सध्याच्या काळामध्ये झालेला आहे. याचा शासन - प्रशासन यासह आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता शंभर टक्के लसीकरण करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे महत्त्वाचे आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकाला कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत नाही. अशा नागरिकाला कोरोना झाला तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे. आत्तापर्यंत अनेक घटनांमध्ये ते सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील नागरिकांना लसीकरण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसीचा डोस प्रत्येक आरोग्य केंद्रावर उपलब्ध करून द्यावेेत. याबाबत शासनाने आपले सर्व अधिकार वापरून सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी. या गंभीर संकटाच्या वेळी सरकारने नागरिकांचे पालक म्हणून जेवढे शक्य आहे ते सर्व प्रयत्न करून लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा. लसीकरण वेगाने झाल्यास महामारीपासून नागरिकांचे रक्षण होणार आह, असे नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.