शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

श्री श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे दीपोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 15:20 IST

Diwali, Fort, Satara area, Religious Places दिवाळीची पहिली आंघोळ अर्थात नरक चतुर्थी दिवशी "एक दिवा शिवरायांच्या चरणी" या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते.

ठळक मुद्देश्री श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे दीपोत्सव उत्साहातदोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर

परळी :दिवाळीची पहिली आंघोळ अर्थात नरक चतुर्थी दिवशी "एक दिवा शिवरायांच्या चरणी" या संकल्पनेची कास धरून आज श्री दुर्गेश्वर सज्जनगड येथे पहिला दीपोत्सव पहाटे पाच वाजता मशाली पेटवून करण्यात आला. परळी दऱ्याखोऱ्यातील सुमारे दोनशेहून अधिक मावळे मशाली घेऊन सज्जनगडावर दाखल झाले होते.भल्यापहाटे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार, श्री समर्थ महाद्वार तसेच बुरुज तटबंदीला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करत प्रेरणामंत्र, नाम जयघोष करून श्री अंगलाई देवी मंदिरापासून धाब्याचा मारुती, श्रीराम मंदिर, समाधी मंदिर, पेठेतील मारूती ते छत्रपती शिवाजी महाद्वारापर्यंत मशाली दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने अवघा सज्जनगड दुमदुमून निघाला होता.छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य स्थापनेसाठी सह्याद्रीच्या डोंगररांगावर असलेले सर्व गड किल्ले आपला इतिहास आपली संस्कृती स्वाभिमानाने व अभिमानाने जिवंत दिसून येत आहे आपण गड-किल्ल्यांची संख्या वाढवू शकत नसलो तरीही त्यांचे सौंदर्य संवर्धन वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या वाट्याला जितके गड-किल्ले आहेत ते पुढच्या पिढीला सुस्थितीत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे आवाहनही यावेळी जमलेल्या शिवभक्तांनी केले. यावेळी मावळ्यांनी दिलेल्या जय घोषणांनी संपूर्ण सज्जनगड दुमदुमून गेला होता तसेच दुर्ग संवर्धनाच्या अशाच काही मोहिमा भविष्यातही राबवणार असल्याचे दुर्गसंवर्धकानी यावेळी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023FortगडSatara areaसातारा परिसरReligious Placesधार्मिक स्थळे