शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

बिचुकले गावच्या जलयुक्त चळवळीचा डंका

By admin | Updated: March 23, 2017 16:47 IST

दुष्काळ निवारण : ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हेच लक्ष्यचा नारा

आॅनलाईन लोकमत

वाठार स्टेशन : कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील बिचुकले गावाने काळाची पावले ओळखून ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य,ह्ण असा नारा देत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गाव परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळ निवारणाचे काम हाती घेतले आहे. याचा डंका आता सर्वत्र वाजू लागला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील डॉ. सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान ग्रुप या नावाने संस्था स्थापन करण्यात आली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून गावातील शेकडो युवक, ग्रामस्थ आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी एक दिवस श्रमदान करत आहेत. अशामुळेच याची दखल घेण्यात आल्याने गुढी पाडव्यादिवशी या गावच्या जलसंधारण कामाची यशोगाथा संपूर्ण राज्यभर दिसणार आहे.

चहू बाजूने विस्तारलेले डोंगर आणि या मधोमध असलेले बिचुकले हे साधारण दोन ते तीन हजार लोकसंख्येच गाव. गावाशेजारी पूर्व व दक्षिण बाजूला डोंगर तर पश्चिमेला देऊर गाव अशा निसर्गसानिध्यात असलेल्या या गावाने कायमच्या दुष्काळावर मात करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या तीनवर्षांपासून हे गाव दुष्काळ निवारणासाठी झटू लागले. गाव परिसरात असलेल्या डोंगरावर पाणी अडवणे. तसेच वृक्षारोपण करणे वाहून जाणारे पाणी अडवणे व जिरवण्याचे काम या गावाने सुरू ठेवले आहे.

या गावातील युवक, ग्रामस्थांच्या या प्रयत्नांना आज अपेक्षित यशसुद्धा मिळालेय. बिचुकले गाव परिसरातील गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असली तरी या गावात मात्र अद्याप कोणताही टँकर लावण्याची आवश्यकता भासत नाही. गावचा दुष्काळ हटवण्यासाठी आता हे सर्वच गावकरी मनापासून कामाला लागले आहेत. नुकतीच ग्रामसभाही बोलावण्यात आली होती. यासाठी युवकांपासून सर्वच ग्रामस्थ व महिलांनी या लढ्यात एकत्र येऊन गावाचा चेहरा बदलण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील या गावाचा आदर्श शेजारील गावांनी घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर) बक्षीस मिळविण्यापेक्षा काम महत्त्वाचे...गतवर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्यासाठी अभिनेता अमीर खान, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली. केवळ शासकीय मदतीवर किंवा निसर्गावर अवलंबून न राहता लोकसहभागाच्या आणि श्रमदानाच्या माध्यमातून जनजागृती व जलजागृती करणे हे पाणी फाउंडेशनचे मुख्य ध्येय असल्याने त्यांनी कोरेगावसह महाराष्ट्रातील तीन तालुके यासाठी निवडले. यामध्ये बिचुकले गाव सहभागी झाले. केवळ बक्षीस मिळवण्यापेक्षा संघटितपणे या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला. याचा मोठा फायदा आज हे गाव अनुभवत आहे. यापुढे कुठेही न थांबता आता ही चळवळ या पुढेही सुरूच ठेवण्याची भूमिका या गावकऱ्यांनी घेतली आहे.