ढासळत्या दरामुळे साखर उद्योग अडचणीत

By Admin | Updated: August 28, 2015 22:54 IST2015-08-28T22:54:50+5:302015-08-28T22:54:50+5:30

गजानन बाबर : ‘प्रतापगड’ साखर कारखान्यात मिल रोलरचे पूजन

The difficulty of the sugar industry due to the downturn | ढासळत्या दरामुळे साखर उद्योग अडचणीत

ढासळत्या दरामुळे साखर उद्योग अडचणीत

कुडाळ : ‘बाजारात घसरलेल्या साखरेच्या दरामुळे साखर उद्योग अडचणीतून जात आहे. त्यामुळे येणारा गळित हंगाम आपल्या सर्वांची सत्त्वपरीक्षा पाहणारा आहे. अशा प्रतिकुल परिस्थतीत शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येणारा हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन उपाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी केले.किसन वीर साखर कारखान्याने भाडे तत्त्वावर घेतलेल्या सोनगाव येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या येणाऱ्या गळित हंगाम २०१५-१६ च्या मिल रोलरचे पूजन किसन वीर आणि प्रतापगडच्या संचालक मंडळाच्या हस्ते केले. त्यावेळी ते बोलत होते.किसन वीर आणि प्रतापगड कारखान्याकडे नोंद झालेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने किसन वीर कारखान्याच्या व्यवस्थापनाने सर्व उपाययोजना आखलेल्या आहेत. आनंदराव इथापे यांचा सपत्निक सत्कार आणि कर्मचाऱ्यांना मानधन वाटप केले. हणमंत निकम यांनी आभार मानले.यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, राहुल घाडगे, मधुकर शिंदे, सयाजी पिसाळ, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार, अरविंद कोरडे, विजया साबळे, प्रभारी कार्यकारी संचालक एन. बी. पाटील, प्रतापगड कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे-पाटील, संचालक सौरभ शिंदे, अंकुशराव शिवणकर, बाळासाहेब निकम, संदीप सपकाळ, विकास देशमुख, रघुनाथ तरडे, लाला भिसे, आर. बी. जगदाळे, विकास गाढवे, किसन वीरचे प्रॉडक्शन मॅनेजर ए. एस. साळुंखे, एच. आर. मॅनेजर ए. टी. शिंगटे, एस. जे. कदम, राजेंद्र भिलारे, विठ्ठल कदम, अभिजित शिंदे, भाऊराव शेवते, कुडाळ उपसरपंच गणपत कुंभार, जे. टी. पवार, भगवान राक्षे, जयदीप शिंदे, नारायण पाटील, आनंदराव मोहिते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The difficulty of the sugar industry due to the downturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.