साताऱ्यात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात ; वीज पुरवठा खंडित, सातारकर अंधारात...
By नितीन काळेल | Updated: November 25, 2023 23:14 IST2023-11-25T23:13:53+5:302023-11-25T23:14:08+5:30
सातारा शहरात रात्री साडेआठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा सव्वा नऊ वाजल्यापासून धो - धो पाऊस कोसळत आहे.

साताऱ्यात विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात ; वीज पुरवठा खंडित, सातारकर अंधारात...
नितीन काळेल
सातारा : सातारा शहरात रात्री साडेआठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पुन्हा सव्वा नऊ वाजल्यापासून धो - धो पाऊस कोसळत आहे.
विजांचा कडकडाट सुरू असल्याने सातारा शहरासह परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिक अंधारात आहेत. तर वारेही वेगाने वाहत आहेत. पत्र्याच्या फलकांचा धाडधाड आवाज येत आहे. सव्वा दहा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता.