शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कर्मवीर जयंतीच्या पूर्वसंध्येला रयत सेवकांचा आक्रोश, प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन  

By प्रगती पाटील | Updated: September 21, 2023 18:27 IST

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कंटिन्यूएशन मेमो असलेल्या सेवकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व विभागातील प्रलंबित असलेल्या वैयक्तिक मान्यता ...

सातारा : रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित कंटिन्यूएशन मेमो असलेल्या सेवकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालय सर्व विभागातील प्रलंबित असलेल्या वैयक्तिक मान्यता होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी मान्यता होईपर्यंत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती रयत शिक्षण संस्था व संस्थेच्या शहरातील सर्व स्थानिक शासनाच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला धरणे आंदोलन सुरू केल्याने कार्यक्रमास गालबोट लागण्याची भीती आहे.संस्थेला दिलेल्या निवेदनात तीव्र नाराजी व्यक्त करत नॉन पिटीशनर सेवकांच्या वैयक्तिक मान्यते संदर्भात त्रुटी पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव संचालक कार्यालयात तात्काळ पाठवावेत, उपसंचालकांनी कडे कळविलेल्या कृती पत्रातील अटी व शर्तींची पूर्तता करण्यासाठी संस्था स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही व्हावी, कंटिन्यूएशन मेमो असणाऱ्या सेवकांच्या वैयक्तिक मान्यता घेऊन संस्थेतील अनुदानित उपलब्ध जागेवर नेमणुका देऊन उर्वरित सेवकांना माध्यमिक विभागाकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच संस्थेतील सर्व सेवकांचे समायोजन होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलला जागा देऊ नये अशी मागणी केली आहे. वरील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व सेवक संविधानिक पद्धतीने शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करणार आहेत यादरम्यान सेवकांच्या जीवनात धोका निर्माण झाल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यात रयत शिक्षण संस्था सातारा व संस्थेचे पदाधिकारी जबाबदार असतील असेही सूचित करण्यात आले आहे. या निवेदनावर शरद इवरे, डॉ. सुजित हेगडे, विक्रांत पाटील, सूर्यकांत धनवडे, अंजूम मुलाणी यांच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरagitationआंदोलन