धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:13 IST2021-02-18T05:13:13+5:302021-02-18T05:13:13+5:30

फलटण : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारेच पुढे जातील. भविष्यात ...

Dhangar strives for the development of the society | धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

फलटण : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारेच पुढे जातील. भविष्यात धनगर समाजाला योग्य दिशेने पुढे नेण्याचे आणि समाजाच्या विकासासाठी काम करणार आहे,’ असे प्रतिपादन इंदौर संस्थानचे युवराज यशवंतराव होळकर यांनी केले.

होळकर राजघराण्याचे मूळ गाव असलेल्या फलटण तालुक्यातील मुरुम येथील मल्हारराव होळकर यांच्या स्मारकाला यशवंतराव होळकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, कागलचे अखिलेशराजे घाटगे, अमरसिंहराजे बारगळ, रामभाऊ लांडे, प्रतीक रजपूत, राजूअण्णा होळकर, डी. के. पवार उपस्थित होते.

यशवंतराव होळकर म्हणाले, ‘मल्हारराव होळकर व माँसाहेब अहिल्यादेवी होळकर यांच्यावर सर्वांनी खूप प्रेम केले आहे. माहेश्वरला आल्यावर तेथील संस्कृती नक्की आवडेल. या भागात आपल्या समाजाचा जो विकास व्हायला हवा त्यादृष्टीने यापुढे प्रयत्न करण्याची ग्वाही देऊन उपयोग नाही. योग्य दिशेने काम केले तरच आपण पुढे जाऊ.’

संजीवराजे म्हणाले, ‘इंदौर संस्थान हे भारतातील अतिशय संपन्न असे संस्थान आहे. या संस्थानचे मूळ पुरुष हे फलटण तालुक्यातील होते. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातांनी फक्त त्यांच्या संस्थानाचा उद्धार केला नाही तर अखंड भारतात विहिरी, घाट यासारखी कामे करत सर्वांगीण विकासाचे काम केले आहे. एवढेच नव्हे मल्हारराव होळकर हे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर इतिहासातील दोन खंड असणारे ते सुभेदार आहेत. महादजी शिंदे व मल्हारराव होळकर हे दोन्ही शूरवीर सातारा जिल्ह्यातील आहेत. मल्हारराव होळकर यांचे वंशज आज फलटणला आले आहेत. त्यांनी आता त्यांच्या धनगर समाजाचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.’

रघुनाथराजे, अमरजितसिंहराजे बारगळ, शंकरराव माडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माणिक सोनवलकर, उपसभापती रेखाताई खरात, प्रा. भिमदेव बुरुंगले, नितीन भोसले, सुदामराव सूळ, सागर कांबळे, विनायकराव बेलदार-पाटील उपस्थित होते.

फोटो१७फलटण-होळकर

फलटण येथे यशवंतराव होळकर यांनी भेटी दरम्यान मार्गदर्शन केले. यावेळी रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते. (छाया : नसिर शिकलगार)

Web Title: Dhangar strives for the development of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.