धनगर समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज : काकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST2021-08-20T04:45:04+5:302021-08-20T04:45:04+5:30
वडूज : ‘धनगर समाजाने स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज ...

धनगर समाजाने शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज : काकडे
वडूज : ‘धनगर समाजाने स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात येणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.
सातेवाडी येथे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सागर डोंबाळे यांची महासंघाच्या युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. दिलीप बरकडे होते. यावेळी माजी सरपंच हनुमंत कोळेकर उपस्थित होते.
काकडे म्हणाले, ‘धनगर समाजाला सातत्याने राजकीय नेते मंडळींनी झुलवत ठेवल्यामुळे समाजाची प्रगती होऊ शकली नाही. त्यासाठी धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्गाने व युवक वर्गाने एकत्र येऊन समाजामध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. धनगर समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करून समाजाने शैक्षणिक प्रवाहात आल्यानंतरच समाजाची प्रगती होईल. धनगर समाजाचा सर्वच राजकीय नेतेमंडळींनी व पक्षांनी राजकारणापुरता गैरफायदा घेतला आहे. धनगर समाजाला सर्व क्षेत्रातून संपवण्याचे षड्यंत्र केले जात आहे.’
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू लोखंडे, स्वामी डोंबाळे, संतोष काळे, डॉ. महेश माने, हेमंत कोळेकर, अजित काळे, दादासाहेब डोंबाळे, दत्तात्रेय कोळेकर, विक्रम काळे, समीर गोरड, समीर काळे, प्रल्हाद डोंबाळे, राहुल डोंबाळे, दीपक डोंबाळे, सुरेश डोंबाळे, जालिंदर डोंबाळे, नाना शिंगटे, दत्तात्रय कचरे, विठ्ठल डोंबाळे, रामभाऊ काळे, आनंदराव डोंबाळे, महादेव पाटोळे, गणेश डोंबाळे, अर्जुन काळे उपस्थित होते.