धनगर समाजाची भटकंती थांबेल
By Admin | Updated: September 29, 2014 00:47 IST2014-09-29T00:47:24+5:302014-09-29T00:47:24+5:30
जयकुमार गोरे : म्हसवड येथे समाज बांधवांच्या बैठकीत विश्वास

धनगर समाजाची भटकंती थांबेल
म्हसवड : ‘धनगर समाजाने माझ्या राजकीय वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. मला घडविण्यात समाजाचा मोठा वाटा आहे. आरक्षण लढ्यात मी आपल्या पाठीशी ठामपणे राहिलो. उरमोडीचे पाणी शेतापर्यंत पोहोचवून जिहे-कठापूर, तारळीचे पाणी आणून आगामी पाच वर्षांत धनगर समाज बांधवांना उपजीविकेसाठी भटकंती करावी लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणार आहे,’ असा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
म्हसवड येथे धनगर समाज बांधवांच्या खटाव-माण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
आ. गोरे म्हणाले, ‘अनेकांनी धनगर समाजाचा स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, याची खंत वाटते. मी राजकारणात आलो तेव्हा आपण मला ताकद दिली. तुमच्याशिवाय जयकुमार घडलाच नसता. या जोरावरच माणमध्ये जलक्रांती घडवू शकलो. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ मिळाली. ’
यावेळी अर्जून काळे, दादासाहेब काळे, नगरसेवक शंकरशेठ वीरकर, नबाजी वीरकर, डॉ. वसंतराव मासाळ, सदाशिव गोरड, शामराव कोळेकर, शिवराम घुटुगडे, चंद्रकांत दडस, बाबासाहेब हुलगे, पोपट मासाळ यांनी मनोगत व्यक्त केला. (प्रतिनिधी)