शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

साताऱ्यातील ‘डीजी’महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बोगस नोटांविरुद्ध विशेष मोहीम

By प्रगती पाटील | Updated: September 15, 2023 13:56 IST

चलनात वाढतेय बोगस नोट

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या स्वायत्त महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने असली व नकली चलनी नोटा ओळखण्याबाबतचे तंत्र शिकवण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेअंतर्गत बँकिंग चे विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना खऱ्या व खोट्या नोटा ओळखण्याबाबतचे तंत्र शिकवत आहेत.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वर्गात घेतलेले बँकिंग विषयक ज्ञान परिसरातील जनतेलाही उपयुक्त ठरावे व आपल्याकडील ज्ञानाचा लाभ समाजातील विविध घटकांना व्हावा या भूमिकेतून महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभाग गेली तीन वर्षे हे अभियान राबवत आहे. प्रतिवर्षी दीड ते दोन हजार नागरिकांना खºया व खोटा नोटा कशा ओळखाव्यात, खºया नोटांची पारख कशी करावी याबाबतची माहिती दिली जाते. प्रत्येक विद्यार्थी किमान दहा कुटुंबात जाऊन तेथील सदस्यांना याबाबतची माहिती देत असतात.

चलनात वाढतेय बोगस नोटरिझर्व बँकेने दिलेल्या आकडेवारी नुसार सन २०२०-२१ मध्ये दोन लाख आठ हजार सहाशे, सन २०२१-२२ बावीस मध्ये दोन लाख तीस हजार नऊशे, तर २०२२-२३ मध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे इतक्या बोगस चलनी नोटा सापडल्या आहेत. रिझर्व बँकेच्या एका अहवालानुसार बँकिंग चॅनलमध्ये सापडलेल्या नोटांचे प्रमाण वाढत असून देशातील चलनामध्ये देखील अशा नोटांचे प्रमाण वाढत आहे.

सध्या डिटेक्ट झालेल्या नोटांचे प्रमाण दोन लाख २५ हजार पेक्षा अधिक असले तरी देशाच्या चलन व्यवस्थेत यापेक्षाही अधिक प्रमाणात बोगस नोटा असू शकतात अशा नोटा अनेक नागरिकांच्या हातातून हस्तांतरित होत असतात. अशा नोटा वेळीच ओळखून त्या चलनातून बाहेर करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. म्हणून नोटा कशा ओळखाव्यात याची जागृती विद्यार्थी करत आहेत. - डॉ. विजय कुंभार, बँक मॅनेजमेंट विभाग प्रमुख

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी