कुडाळ येथे धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:29+5:302021-04-04T04:40:29+5:30
कुडाळ : संपूर्ण राज्यबरोबरच जिल्ह्यातही कोरोनाची संख्या वाढत आहे. जावळी तालुक्यातही कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ...

कुडाळ येथे धडक कारवाई
कुडाळ : संपूर्ण राज्यबरोबरच जिल्ह्यातही कोरोनाची संख्या वाढत आहे. जावळी तालुक्यातही कोरोनाचा प्रभाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली, तसेच कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या दुकानदार आणि ग्राहकांवर दंडात्मक कारवाईच्या सूचना केल्या.
यावेळी मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक महेश कदम, उपसरपंच सोमनाथ कदम, गावकामगार तलाठी रामकिसन जाधव उपस्थित होते.
जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने सायंकाळी आठ ते सकाळी सातपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक एकत्र दिसल्यास यांच्यावर कारवाई होणार आहे. विनामास्क, सामाजिक अंतराचे पालन नागरिकांना करणे आवश्यक आहे. वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंध उपायांचे पालन होताना दिसत नाही. कोरोना संपल्यासारखे सर्वजण वावरताना पाहायला मिळत आहेत. यामुळेच जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे आणि मपोलीस यंत्रणेने कुडाळ या बाजारपेठेच्या ठिकाणी अचानकपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी मास्क न लावलेले दुकानदार, वाहन चालक व ग्राहक यांच्यावर कारवाईही करण्यात आली.