देऊर-बिचुकले रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:41 IST2021-04-23T04:41:59+5:302021-04-23T04:41:59+5:30

वाठार स्टेशन : देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली. २८०० ...

Deur-Bichukale road problem solved | देऊर-बिचुकले रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

देऊर-बिचुकले रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी

वाठार स्टेशन : देऊर-बिचुकले गावांना जोडणारा पक्का रस्ता व्हावा, ही अनेक वर्षांपासूनची दोन्ही गावांची मागणी अखेर मंजूर झाली. २८०० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली असून लवकरच या दोन्ही गावांना जोडणारा मजबूत रस्ता होणार आहे.

महाराष्ट्र शासन उद्योग व अपारंपरिक ऊर्जाअंतर्गत देऊर- बिचुकले गावाच्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी अंदाजे २ कोटी ७५ लाख ३८ हजार ८४४ रुपयांची मंजुरी मिळाली आहे. सध्या हे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कामासाठी देऊरचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. आमदार महेश शिंदे यांच्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात साकारला जात आहे.

देऊरपासून बिचुकले नलवडेवाडी गावांना या रस्त्याचा फायदा होणार आहे. तसेच शेतीसाठीही हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

कोट

देऊर-बिचुकले हा जुना कच्चा रस्ता होता. मात्र अनेक ठिकाणी या रस्त्यावर अडचणी असल्याने लोकसहभागातून नव्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी देऊर- बिचुकले गावातील शेतकऱ्यांनी विनामोबदला जमिनी देऊन सहकार्य केले. यामुळेच हा रस्ता मार्गी लागला आहे.

- प्रशांत पवार,

सरपंच बिचुकले.

Web Title: Deur-Bichukale road problem solved