शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:59+5:302021-02-13T04:37:59+5:30

औंध : ‘खटाव तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून फळबाग शेती, कुक्कुटपालन, ग्रीन हाऊस, दुग्धव्यवसाय यांसारख्या उद्योग व्यवसायासाठी बँकेने सकारात्मक भूमिका ...

Determined to solve the problems of farmers | शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध

शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध

औंध : ‘खटाव तालुक्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून फळबाग शेती, कुक्कुटपालन, ग्रीन हाऊस, दुग्धव्यवसाय यांसारख्या उद्योग व्यवसायासाठी बँकेने सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीत करावा, त्यासाठी लागणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील,’ अशी ग्वाही माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.

औंध येथे देशमुख दूध संकलनास त्यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हणमंतराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल माने, गणेश देशमुख, शिवाजी चव्हाण, सचिन पवार, गोविंद पवार याची उपस्थिती होती.

घार्गे म्हणाले, ‘जिल्हा मध्यवर्ती बँकेने सामान्य शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून चिकाटीने केला तर यश मिळतेच.’ गणेश देशमुख यांनी आभार मानले. (वा.प्र.)

१२औंध जाहिरात

फोटो : औंध येथे दूध संकलन केंद्रात प्रभाकर घार्गे यांचा सत्कार करताना शिवाजी चव्हाण, शेजारी हणमंतराव शिंदे, गणेश देशमुख, अनिल माने आदी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)

Web Title: Determined to solve the problems of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.