संशयित घरफोड्यास पाठलाग करून पकडले;
By Admin | Updated: May 11, 2015 00:44 IST2015-05-11T00:43:40+5:302015-05-11T00:44:24+5:30
दोघे पसार

संशयित घरफोड्यास पाठलाग करून पकडले;
सातारा : शहरातील पीरवाडी भागात शनिवारी रात्री घरफोडी करून तीन चोरट्यांनी एक लाख ७२ हजारांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, सतर्क नागरिक आणि गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून त्यापैकी एकास पकडले, तर दोघे पळून गेले.
ज्ञानेश्वर ऊर्फ चिव्या नाना भोसले (वय २९, रा. निंबूत, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीरवाडी येथील फारूख इसाक शेख यांचे बंंद घर शनिवारी रात्री साडेतीनच्या सुमारास तिघांनी फोडले. शेख हे मेकॅनिक असून, त्यांचे जुना मोटार स्टँड परिसरात दुकान आहे. घरात कोणी नसल्याने शनिवारी रात्री त्यांच्या घराला कुलूप होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सहा तोळ्यांचे ९० हजार रुपये किमतीचे गंठण, अडीच तोळ््याचे ३७ हजारांचे नेकलेस, ४५ हजार रोख आणि टॉप्स असा एक लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
दरम्यान, शेजाऱ्यांना चाहूल लागल्याने दुचाकीवरून काही जणांनी त्यांचा पाठलाग केला. महामार्ग ओलांडून चोरटे पलीकडील बाजूला गेले, तेव्हा तेथून पोलिसांची गस्तीची गाडी निघाली होती. नागरिक आणि पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला; परंतु तिघांपैकी दोघे पळून गेले, तर ज्ञानेश्वर ऊर्फ चिव्या भोसले पोलिसांच्या हाती लागला. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)