मेढा येथे शॉर्टसर्किटमुळे दुकान खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST2021-04-08T04:40:02+5:302021-04-08T04:40:02+5:30
कुडाळ : मेढा (ता. जावळी) येथील शिवाजीनगर नवीन एसटी स्टँडसमोरील चंद्रकांत चिंचकर यांच्या मालकीच्या गौरी किराणा जनरल स्टोअर्सला बुधवारी ...

मेढा येथे शॉर्टसर्किटमुळे दुकान खाक
कुडाळ : मेढा (ता. जावळी) येथील शिवाजीनगर नवीन एसटी स्टँडसमोरील चंद्रकांत चिंचकर यांच्या मालकीच्या गौरी किराणा जनरल स्टोअर्सला बुधवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकान पूर्णतः जळून खाक झाले आहे.
याबाबत मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की, बुधवारी पहाटेच्या ३.४५ च्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याचे अशोक पाटणे यांनी पाहिले. याबाबत चिंचकर यांना आरडाओरडा करून जागे केले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. मेढा येथील पाणी टँकर व सातारा येथून आलेल्या फायर ब्रिगेडमुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले.
यामध्ये दुकानातील किराणा माल, स्टेशनरी, तेल, साहित्य, फ्रीज, टीव्ही, रोख रक्कम, फर्निचर, आदींचे सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे जबाबात नोंद केले आहे. या जळिताचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. जी. बाबर करीत आहेत.
फोटो:०७मेढा
मेढा (ता. जावळी) येथील किराणा जनरल स्टोअर्स शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाले आहे.