नागझरीतील डोंगराला वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:08+5:302021-03-16T04:39:08+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे वनविभागाचे दोन हेक्टर क्षेत्र भस्मसात झाले. त्यामुळे गवत जळाले, तर ...

Destroy the mountain in Nagzari | नागझरीतील डोंगराला वणवा

नागझरीतील डोंगराला वणवा

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे वनविभागाचे दोन हेक्टर क्षेत्र भस्मसात झाले. त्यामुळे गवत जळाले, तर झाडे होरपळून गेली.

नागझरी येथील वनविभागाच्या हद्दीमधील डोंगरावर रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास वणवा लागला. हे दृश्य नजरेस पडताच नागझरी येथील ग्रामस्थांना याची माहिती दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली. कोळेकर यांनी तत्काळ याबाबतची माहिती रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख व कोरेगावचे वनक्षेत्रपाल राजू आटोळे यांना दिली. आग विझविण्यासाठी तत्काळ परिसरातील लोकांना सोबत घेऊन ब्लोअर मशीन व मिळेल त्या झाडाच्या फांद्यांनी सुरुवात केली. सात ते आठ लोकांच्या सहकार्याने तब्बल दोन तासांनी वणवा आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत वणव्याने दोन हेक्टर क्षेत्रातील सरपटणारे लहान वन्यजीव, कीटक, गवत तसेच विविध प्रकारच्या झाडांची रोपे आगीत जळाली; परंतु आग लवकर आटोक्यात आल्याने इतर वनक्षेत्रातील गवतासह झाडे बचावली आहेत. दरम्यान, खासगी हद्दीतून वणवा वनक्षेत्रात आला असल्याची शक्यता वनरक्षक नवनाथ कोळेकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Destroy the mountain in Nagzari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.