शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Satara ZP Election 2026: भाजपने घेरलं तरी शिंदेसेनेच्या शंभूराज देसाईंनीच मैदान मारलं

By प्रमोद सुकरे | Updated: February 11, 2026 17:25 IST

मंत्री जयकुमार गोरे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसलेंच्या तोफा ठरल्या फोल

प्रमोद सुकरेकराड : पालकमंत्री, शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने दस्तुरखुद्द मित्रपक्ष भाजपने होमपिचवरच घेरलं होतं. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व गणेश नाईक यांनी प्रत्येकी दोन तर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी येथे एक प्रचार सभा घेतली होती. पण मंत्री देसाईंनी एकट्यानेच खिंड लढविली. प्रत्यक्ष निकालानंतर भाजपने घेरलं तरी शिंदेसेनेच्या शंभूराज देसाईंनीच मैदान मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कारण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समिती १३ जागा शंभूराज देसाई यांनी जिंकलेल्या आहेत. तर विरोधी भाजपला फक्त प्रत्येकी एक जागा जिंकता आली आहे.खरंतर राज्यात आणि देशात भाजपबरोबर शिंदेसेना सहभागी आहे. त्यामुळे हातात हात घालून हे एका बाजूला काम करत असताना प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच सातारा जिल्ह्यात ‘दोस्तीत कुस्ती’ सुरू झाली. त्याचाच ट्रेलर पाटण विधानसभा मतदारसंघात पहायला मिळाला. पण मंत्री देसाई भाजपला पुरून उरले आहेत.वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्या आमदारांनी फडणवीस यांना मदत करण्याचा निर्णय घेतला त्यात शंभूराजांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.हे सगळे खरे असले तरी राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो याचा प्रत्यय पाटण विधानसभा मतदारसंघात आला. कारण शंभूराज देसाई यांचे विरोधक असणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकरांना विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने गळाला लावत पाटण विधानसभा मतदारसंघात ताकद वाढवायला मुहूर्त केला. त्यानंतर झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्याच निवडणुकीत मोठी रसदही पुरवली. मात्र, त्याचा उपयोग झाल्याचे दिसले नाही.

पंखात बळ भरण्याचा प्रयत्न फोलनुकत्याच झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारांच्या हातात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी ‘धनुष्यबाण’ दिला. तेथे जाऊन भाषणे ठोकली. नेमकी हीच सल मंत्री जयकुमार गोरे यांच्या मनात राहिली. त्यामुळे त्यांनी देखील पाटणला येत पालकमंत्री कोणीही असू देत आपल्याला काही फरक पडत नाही. असा टोला लगावत पाटणकरांच्या पंखात बळ भरण्याचा प्रयत्न केला होता. पण तो फोल ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नाईकांकडून तर एकेरी भाषाभाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी देखील पाटण तालुक्यात दोन प्रचार सभा घेत पालकमंत्री देसाई यांचा एकेरी भाषेत समाचार घेतला होता. त्यात इथला पालकमंत्री मुंबईला आमचा टांगा पलटी करायला आला होता. त्याच्यात हिम्मत असेल तर टांगा पलटी करून दाखव असे जाहीर आव्हान दिले. त्यावरून ते पाटणला मंत्री देसाईंचा टांगा पलटी करायला प्रचार सभेच्या निमित्ताने आले होते हे लक्षात आल्यावाचून राहिले नाही. पण त्यांच्या भाषणाने शंभूराज देसाईंचा टांगा पलटी तर झाला नाहीच, उलट मतदारांनी शंभूराजांनाच साथ दिल्याचे दिसून आले.

शंभूराजांचा विश्वास मतदारांनी सार्थ ठरविलामाझ्यावर कोणीही काहीही टीका करत असले तरी मी त्यावर काही बोलणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालातूनच मतदार टीकाकारांना उत्तर देतील. असा विश्वास मंत्री शंभूराज देसाईंनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. आता तो विश्वास मतदारांनी सार्थ ठरविल्याचे दिसत आहे.

बनपुरीच्या लेकीनं केली कमालपाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तगड्या उमेदवार असणाऱ्या डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या मृणाल महेश पाटील या २२ वर्षांच्या तरुणीने ही निवडणूक लढली. या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे ही निवडणूक जिंकलीसुद्धा आता त्याचीच चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सध्या सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Despite BJP's challenge, Shambhuraj Desai triumphs in Satara ZP election.

Web Summary : Shinde Sena's Shambhuraj Desai secured victory in Satara ZP election despite BJP's strong challenge. Desai's strategic campaigning led to winning six ZP and thirteen Panchayat Samiti seats in Patan, overshadowing BJP's efforts, highlighting political dynamics.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाShambhuraj Desaiशंभूराज देसाईBJPभाजपा