६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

By Admin | Updated: October 21, 2014 23:46 IST2014-10-21T21:54:17+5:302014-10-21T23:46:12+5:30

विधानसभा निकाल : राजकीय पक्षाचे उमेदवार अधिक

The deposits of 69 candidates were seized | ६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

सातारा : जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांत ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत होते. यापैकी ६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून, यामध्ये राजकीय पक्षाचे ३९, तर अपक्ष उमेदवार ३० आहेत. आठपैकी सात मतदारसंघांत शिवसेना, दोन मतदारसंघात भाजप आणि स्वाभिमानी तर बसपा आणि मनसेच्या सर्वच उमेदवारांचा अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माणमधील उमेदवार सदाशिवराव पोळ यांचीही अनामत रक्कम जप्त झाली. काँग्रेसच्या रजनी पवार, हिंदुराव पाटील यांचीही अनामत रक्कम जप्त झाली.
फलटण विधानसभा मतदारसंघात दादासाहेब गायकवाड (बसपा), डॉ. नंदकुमार तासगावकर (शिवसेना), पोपटराव काकडे (स्वाभिमानी), शामराव काकडे (भारीप बहुजन महासंघ), चंद्रकांत साळवी (रिपब्लिकन सेना) तर अरविंद अगवणे, आनंदा अगवणे, कृष्णा यादव, दीपक चव्हाण, राहुल अहिवळे, विजय भिसे, विनोद मोरे यांची अनामत रक्कम जप्त झाले.
वाई विधानसभा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव (भाजप), डी. एम. बावळेकर (शिवसेना), मयूर नळ (मनसे), रंजन मोरे (बसपा) तर उमेश वाघमारे, सुनील कडले, विजय वानखेडे, संजय गायकवाड या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात हणमंतराव चवरे, (शिवसेना), वसंतराव मोरे (बसपा), युवराज पवार (मनसे), संजय भगत (स्वाभिमानी), रमेश माने (बहुजन मुक्ती पार्टी), तर अपक्ष उमेदवार शिवाजी शिरतोडे यांची अनामत रक्क जप्त झाली.
माण विधानसभा मतदारसंघात किरण सावंत (बसपा), धैर्यशील पाटील (मनसे), रणजित देशमुख (शिवसेना), सदाशिवराव पोळ (राष्ट्रवादी), अजिनाथ केवटे, अनिल देसाई, केशवराव काटे, जगन्नाथ जानकर, शिवाजीराव जाधव, संदीप खरात या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात नरेंद्र पाटील (शिवसेना), उदय कांबळे (बसपा), राजू केंजळे (मनसे), प्रकाश कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी) यांची अनामत रक्कम जप्त झाली.
कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात डॉ. अजिंक्य पाटील (शिवसेना), सतीश रणशिंगरे (बसपा), अ‍ॅड. विकास पवार (मनसे), अ‍ॅड. अण्णाराव पाटील (महाराष्ट्र विकास आघाडी), मुसा मुल्ला (बहुजन मुक्ती पार्टी), अ‍ॅड. मिलिंद देसाई, अ‍ॅड. विद्युलता मर्ढेकर, देवेंद्र शहा, संपत तडाखे या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
पाटण विधानसभा मतदारसंघात शिवाजी कांबळे (बसपा), दीपक महाडिक (भाजप), हिंदुराव पाटील, (राष्ट्रीय काँग्रेस), रवींद्र शेलार (मनसे), प्रियंका साळुंखे (बहुजन मुक्ती पार्टी), डॉ. संदीप माने (शेकाप), हनमंत कांबळे (लोकशासन आंदोलन पार्टी), अंकुश गालवे, चंद्रकांत यादव, दत्तात्रय भिसे, गणेश मोरे, सागर माने, सुनील कांबळे या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
सातारा विधानसभा मतदारसंघातून दिलीप जगताप (बसपा), दगडू सकपाळ (शिवसेना), रजनी पवार (राष्ट्रीय काँग्रेस), राहुल पवार (मनसे), संदीप कांबळे (महाराष्ट्र विकास आघाडी), अभिजीत बिचुकले, सागर भिसे या अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. (प्रतिनिधी)

शासनाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा
सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात ८७ उमेदवार नशीब आजमावत होते. यापैकी ६९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. परिणामी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत लाखो रुपये जमा झाल. निवडून आलेल्या उमेदवाराच्या एकूण मतांपैकी निश्चित मते प्रतिस्पर्धी उमेदवाराला नाही मिळाली तर त्यांची अनामत रक्कम जप्त होते. विशेष म्हणजे शिवसेना, बसपा आणि मनसेच्या सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

Web Title: The deposits of 69 candidates were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.