शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
2
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
3
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
4
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
5
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
6
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
7
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
8
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
9
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
10
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
11
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
12
IND vs PAK : पाकिस्तानच्या खेळाडूंना आता घरी बसवा; भारताकडून पराभव होताच अक्रम संतापला
13
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
14
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
15
चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी
16
'पाकिस्तानशी युद्ध करावे लागेल...', रियासी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेचें मोठे वक्तव्य
17
मुंबईत शिवसेनेच्या 'मशाली'ला मुस्लीम मतदारांचा आधार; उद्धव ठाकरेंकडे कशी वळली एक गठ्ठा मतं? 
18
...तर आमच्याविरूद्ध फलंदाजी करणं कठीण; पराभव होताच पाकिस्तानचे प्रशिक्षक म्हणाले...
19
PM मोदींचे मंत्री शपथ घेत असताना मागे दिसलेला प्राणी कोणता?; मांजर, कुत्रा की बिबट्या?; व्हिडीओ पाहून चर्चेला उधाण
20
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

पाटण तालुक्यात ठेवीदारांच्या जीवाला घोर, अर्थकारण बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 8:30 PM

Banking Sector, Sataranews, Patan पाटण तालुक्यातील अनेक शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या भविष्याची पुंजी म्हणून आर्थिक कुवतीनुसार स्वत:जवळचे पैसे विविध बँका व पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. मात्र, आताच्या स्थितीत तालुक्यातील काही पतसंस्था ठेवीदारांचे मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे परत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या जीवाला घोर लागला आहे.

ठळक मुद्देपाटण तालुक्यात ठेवीदारांच्या जीवाला घोर, अर्थकारण बिघडले काही पतसंस्थांकडून पैसे देण्यास टाळाटाळ

अरुण पवारपाटण : तालुक्यातील अनेक शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या भविष्याची पुंजी म्हणून आर्थिक कुवतीनुसार स्वत:जवळचे पैसे विविध बँका व पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. मात्र, आताच्या स्थितीत तालुक्यातील काही पतसंस्था ठेवीदारांचे मुदत संपलेल्या ठेवींचे पैसे परत करण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या जीवाला घोर लागला आहे.पाटण तालुक्याचा बहुतांशी परिसर दुर्गम आहे. तसेच येथील डोंगर पठारावर अनेक गावे आहेत. त्यामुळे कोणीतरी गावनेते सांगतो म्हणून अनेकांनी आपल्या जवळचे पैसे स्थानिक सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये गुंतवले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक संस्था व बँकांचे कंबरडे मोडले आहे.कर्जवाटप करताना रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या अटीचे पालन न करता आणि आपल्या जवळील रिझर्व्ह फंड म्हणजेच राखीव निधी पुरेसा न ठेवता अनेक पतसंस्थांनी ठेवीदारांचे पैशाचे भरमसाठ कर्जवाटप केले. आणि अचानक कोरोना साथीमुळे अनेक कर्जदारांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्याचा परिणाम बँका आणि पतसंस्थांच्या नफ्यावर झाला आहे. त्यामुळे आता अनेक बँकांनी आणि पतसंस्थांनी कर्ज वाटप करणे बंद केले आहे. मात्र, ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी परत देण्यास काही पतसंस्था टाळाटाळ करू लागल्या असल्याच्या तक्रारी तालुक्याच्या विविध भागांतून होऊ लागल्या आहेत.ठेवीदारांनी मुदत संपलेल्या ठेवीचे पैसे मागताच आज नाही उद्या देतो. अथवा निम्मे पैसे न्या आणि बाकीचे पुन्हा गुंतवा अशा विनवण्या होऊ लागल्या आहेत.बजेट कोलमडले; धास्ती वाढलीकोरोना संसर्ग, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस या तिहेरी संकटामुळे सध्या शेतकऱ्यांसह उद्योजक, व्यावसायिक मोठ्या अडचणीत आहेत. अनेकांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे बँक, पतसंस्थांमध्ये यापूर्वी ठेवलेल्या ठेवीचे पैसे परत मिळवून पुन्हा उभारी घेण्याचा अनेकजण प्रयत्न करीत आहेत. मात्र, पतसंस्थांकडून ठेवीचे पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने धास्ती वाढली आहे.

पाटण तालुक्यात ठेवीदारांचे पैसे परत करण्यास जर कोणती संस्था टाळाटाळ करत असेल तर ठेवीदारांनी आमच्याकडे तक्रार करावी. काही महिन्यांपूर्वी एका संस्थेबाबत ठेवीदारांच्या तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जात आहे.- एस. डी. पवार, सहायक निबंधक, पाटण

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSatara areaसातारा परिसरpatan-acपाटण