हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:36+5:302021-05-03T04:33:36+5:30
कऱ्हाड : हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीस कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेऊन अटक केली. ओगलेवाडी, ता. ...

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्यास अटक
कऱ्हाड : हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीस कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेऊन अटक केली. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड येथे शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. ओगलेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील शेखर ऊर्फ बाळू सूर्यवंशी हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. यापूर्वी पोलिसांनी त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मात्र, तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य सुरूच होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार सुनावणी होऊन ३१ मार्च २०२१ रोजी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी शेखर ऊर्फ बाळू सूर्यवंशी याला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला. मात्र, हद्दपार असतानाही शनिवारी तो ओगलेवाडी येथे आला असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल तानाजी शिंदे व मारुती लाटणे यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तातडीने त्याठिकाणी छापा टाकून शेखर ऊर्फ बाळू सूर्यवंशी याला अटक केली. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिसात केली आहे.
फोटो : ०२शेखर सूर्यवंशी