शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

साताऱ्यातील ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या : १४५ घरांची तपासणी; रात्री औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 20:39 IST

येथील गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये ३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य, हिवताप पथक खडबडून जागे झाले आहे. या पथकाने मंगळवारी १४५ घरांची तपासणी केली

ठळक मुद्देहिवताप पथक तळ ठोकूननागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण आहे.

सातारा : येथील गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये ३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य, हिवताप पथक खडबडून जागे झाले आहे. या पथकाने मंगळवारी १४५ घरांची तपासणी केली. यामध्ये ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे.

स्वाईन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच गुरुवार आणि टॅक्सी गल्लीत ३५ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवार पेठेत एकाच ठिकाणी राहणाºया नागरिकांना ताप, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा असा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेले. वैद्यकीय अहवालानंतर डेंग्यू असल्याचे समजले. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू झाल्याचे पुढे आल्याने दुसºया दिवशी मंगळवारी आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या टीम गुरुवार पेठ परिसरात पोहोचली.

दोन-दोन कर्मचाºयांची टीम तयार करून प्रत्येक घरात तपासणी सुरू झाली. सलग चार तास प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली. सुमारे १४५ घरांची तपासणी झाल्यानंतर त्यामधील ३३ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. तसेच घरात साठवून ठेवलेल्या ४६ पाणीसाठ्यामध्येही अळ्या सापडल्या. तसेच तापाचे १९ रुग्ण आढळले. चारजणांच्या रक्ताचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले. या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना डेंग्यूची लागण झाली की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

राजवाडा येथील कस्तुरबा रुग्णालयाचे पथकही या ठिकाणी आले होते. या पथकानेही अनेकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नागरिकांनी घरात साठविलेल्या पाण्यामध्ये अ‍ॅबेट हे औषध टाकण्यात आले. नागरिकांनी घरामध्ये स्वच्छता ठेवावी, तसेच पाणी साठवून न ठेवता, रोजच्या रोज ताज्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये रात्रीच्या सुमारास औषध फवारणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत. साताºयात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिलीच वेळ ३५ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण आहे. 

नागरिकांनी पाणीसाठा करताना खबरदारी घ्यावी. घरात स्वच्छता ठेवावी, घरासमोर असलेल्या नाल्यात औषध फवारणी करावी. जेणेकरून जंतू बसणार नाहीत, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.-विनोद कुंभारे, आरोग्य सहायक, हिवताप विभाग 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय