साताऱ्यातील ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या : १४५ घरांची तपासणी; रात्री औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 08:36 PM2018-10-16T20:36:01+5:302018-10-16T20:39:46+5:30

येथील गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये ३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य, हिवताप पथक खडबडून जागे झाले आहे. या पथकाने मंगळवारी १४५ घरांची तपासणी केली

Dengue larvae found in 33 houses in Satara: 145 Home inspections; Spray the drug around at night | साताऱ्यातील ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या : १४५ घरांची तपासणी; रात्री औषध फवारणी

साताऱ्यातील ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या : १४५ घरांची तपासणी; रात्री औषध फवारणी

Next
ठळक मुद्देहिवताप पथक तळ ठोकूननागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण आहे.

सातारा : येथील गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये ३५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याने आरोग्य, हिवताप पथक खडबडून जागे झाले आहे. या पथकाने मंगळवारी १४५ घरांची तपासणी केली. यामध्ये ३३ घरांत डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे.

स्वाईन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असतानाच गुरुवार आणि टॅक्सी गल्लीत ३५ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गुरुवार पेठेत एकाच ठिकाणी राहणाºया नागरिकांना ताप, अंगदुखी, कंबरदुखी, थकवा असा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेले. वैद्यकीय अहवालानंतर डेंग्यू असल्याचे समजले. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू झाल्याचे पुढे आल्याने दुसºया दिवशी मंगळवारी आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या टीम गुरुवार पेठ परिसरात पोहोचली.

दोन-दोन कर्मचाºयांची टीम तयार करून प्रत्येक घरात तपासणी सुरू झाली. सलग चार तास प्रत्येक घराची तपासणी करण्यात आली. सुमारे १४५ घरांची तपासणी झाल्यानंतर त्यामधील ३३ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. तसेच घरात साठवून ठेवलेल्या ४६ पाणीसाठ्यामध्येही अळ्या सापडल्या. तसेच तापाचे १९ रुग्ण आढळले. चारजणांच्या रक्ताचे नुमने तपासणीसाठी घेण्यात आले. या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना डेंग्यूची लागण झाली की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

राजवाडा येथील कस्तुरबा रुग्णालयाचे पथकही या ठिकाणी आले होते. या पथकानेही अनेकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नागरिकांनी घरात साठविलेल्या पाण्यामध्ये अ‍ॅबेट हे औषध टाकण्यात आले. नागरिकांनी घरामध्ये स्वच्छता ठेवावी, तसेच पाणी साठवून न ठेवता, रोजच्या रोज ताज्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवार पेठ आणि टॅक्सी गल्लीमध्ये रात्रीच्या सुमारास औषध फवारणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत. साताºयात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिलीच वेळ ३५ जणांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही घबराटीचे वातावरण आहे.
 

नागरिकांनी पाणीसाठा करताना खबरदारी घ्यावी. घरात स्वच्छता ठेवावी, घरासमोर असलेल्या नाल्यात औषध फवारणी करावी. जेणेकरून जंतू बसणार नाहीत, याची काळजी नागरिकांनी घ्यावी.
-विनोद कुंभारे, आरोग्य सहायक, हिवताप विभाग

 

 

Web Title: Dengue larvae found in 33 houses in Satara: 145 Home inspections; Spray the drug around at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.