शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्यास आज प्रारंभ, 'या' मार्गाने वळविण्यात आली सातारा-कोल्हापूर लेनवरील वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:32 IST

सोमवारी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाखालील सर्व बोगदे वाहतुकीला बंद करण्यात आले

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला. आज, बुधवारी सकाळपासूनच पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. शासकीय विश्रामगृहात मंगळवारी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबतचे नियोजन स्पष्ट करण्यात आले.दरम्यान, बैठकीनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी कोल्हापूर नाक्यावर जाऊन पाहणी केली. ढेबेवाडी फाटा येथेही त्यांनी भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या.शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक सरोजिनी पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, झाकीर पठाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नितीन काशिद, दादासाहेब शिंगण यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल रविवारी पाडला जाणार होता. मात्र. मशिनरी नसल्यामुळे तसेच आवश्यक त्या उपाययोजना न झाल्यामुळे पूल पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर सोमवारी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पुलाखालील सर्व बोगदे वाहतुकीला बंद करण्यात आले. कऱ्हाड शहरात येणारी वाहतूक पाटण तिकाटणे मार्गाने वळविण्यात आली, तर मंगळवारी आढावा बैठकीत पुढील नियोजन स्पष्ट करण्यात आले.त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा उड्डाण पुलावरून होणारी वाहतूक बंद केली जाणार आहे, तर बुधवारी सकाळपासून पूल पाडण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती प्रोजेक्टचे प्रमुख इंजिनिअर सतेंद्राकुमार वर्मा यांनी दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर