हल्लेखारांच्या निषेधार्थ फलटणमध्ये मूकमोर्चा
By Admin | Updated: May 9, 2014 00:00 IST2014-05-09T00:00:56+5:302014-05-09T00:00:56+5:30
सातारा : फलटण शहरातील वृत्तपत्र कार्यालये आणि एकूणच येथील पत्रकरितेवर काही समाजकंटकांनी हल्ला करून केलेली तोडफोड केली.

हल्लेखारांच्या निषेधार्थ फलटणमध्ये मूकमोर्चा
सातारा : फलटण शहरातील वृत्तपत्र कार्यालये आणि एकूणच येथील पत्रकरितेवर काही समाजकंटकांनी हल्ला करून केलेली तोडफोड केली. याच्या निषेधार्थ फलटण शहरातून गुरुवारी मूकमोर्चा काढण्यात आला. फलटण : येथे हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांसह, विविध राजकीय, सामाजिक संघटना, वारकरी सांप्रदाय मंडळ आणि शहरवासीय यांच्या सहभागाने सर्व प्रशासकीय कार्यालये असलेल्या अधिकार गृहांवर मूक मोर्चा काढण्यात आला. मूकमोर्चात वारकरी टाळ, पखवाजासह सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, भाजपा, मनसे, रिपब्लिकन पँथर, तालुका संघर्ष कृती समिती, महात्मा फुले समता परिषद, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, स्वराज संघटना, प्राथमिक शिक्षक संघ, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टचार निर्मूलन समिती, शिवप्रतिष्ठान, महाराष्ट्र नाभिक संघटना, सावता माळी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, एसटी कामगार संघटना, नामदेव शिंपी समाज, चर्मकार संघटना, रिक्षा संघटना, वकील संघ आदी संघटनेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अॅड. नरसिंह निकम, अनुप शहा, नंदकुमार कुमठेकर महाराज, जयकुमार इंगळे, हरिष काकडे, संतोष ठोंबरे, युवराज शिंदे, बी. टी. जावळे, अमिरभाई मेटकरी यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे, उपसभापती विवेक शिंदे, डॉ. बाळासाहेब शेंडे, नितीन भोसले, दिगंबर आगवणे, विलास नलवडे, मिलिंद नेवसे, अमोल निंबाळकर आदी उपस्थित होते. प्रा. उमेश आढाव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)