शेडची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST2021-07-03T04:24:04+5:302021-07-03T04:24:04+5:30
कुसूर : घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे एस.टी. थांबा शेड उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या चौपदरीकरण कामावेळी ...

शेडची मागणी
कुसूर : घारेवाडी (ता. कऱ्हाड) येथे एस.टी. थांबा शेड उभारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या चौपदरीकरण कामावेळी ठिकठिकाणची शेड जमीनदोस्त करण्यात आली असून ती पुन्हा बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहनाची वाट पाहत उन्हात थांबावे लागत आहे.
वाहनांवर कारवाई
कऱ्हाड : शहरात फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. नियमबाह्य नंबरप्लेट पोलीस जप्त करीत आहेत. तसेच संबंधित वाहनधारकाला दंडही केला जात आहे. वाहनधारकांनी फॅन्सी नंबरप्लेट वाहनाला वापरू नयेत; अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
नाल्यांची दुरवस्था
कऱ्हाड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येऊन पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. गटाराची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
विटा मार्ग खड्ड्यात
कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडीपर्यंत कऱ्हाड-विटा मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.