शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोसळत्या पावसात धनगर समाज रस्त्यावर आरक्षणाची मागणी : अनुसूचित जमातीनुसार सवलती देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 21:24 IST

धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सातारा : धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कोसळत्या पावसातही धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी भिजत रस्त्यावर बसून राहिले.

‘एक धनगर, कोट धनगर’च्या गगनभेदी घोषणा देत धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आरक्षणासंदर्भात सरकारवर हल्लाबोल करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. येथील सैनिक स्कूल मैदानापासून सुमारास धनगर समाजबांधवांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये पारंपरिक वेशात धनगर समाजबांधव सहभागी झाले होते. याप्रसंगी समाजबांधवांच्या वतीने मनोगतेही व्यक्त करण्यात आली.

धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊनही फसवणूक करण्यात आल्याचा आरोप समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करताना केला. या राज्यकर्त्यांवर आता विश्वास राहिला नाही, अशी भावना धनगर समाजबांधवांमधून व्यक्त होत होती. ‘येळकोट येळकोट जय मल्हार, उठ धनगरा जागा हो.. आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचं.. नाही कुणाच्या बापाचं, एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे, एक धनगर कोट धनगर, कोण म्हणतंय देत नायं.. घेतल्याशिवाय राहत नाही,’ अशा गगनभेदी घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता. कपाळी भंडारा आणि हातात झेंडे घेतलेल्या महिला व युवकांची मोर्चात लक्षणीय गर्दी होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर समाजबांधव येऊन थांबले. ‘ना नेता, ना पक्ष आता धनगर दक्ष’, धनगड दाखवा नाहीतर शिफारस पाठवा,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलकांच्या कपाळावर पिवळा भंडारा लावलेला होता, अनेकजण खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन आले होते. या आंदोलनामुळे सातारा कोरेगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. यावेळी सात मुलींनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर करण्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. बारामतीमध्ये मोर्चा काढला तेव्हा ‘आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. धनगर समाजाच्या जीवावर जशी सत्ता मिळविता येते, हे राज्यकर्त्यांना माहीत आहे; पण तशाच पद्धतीने आम्ही ती ओढून घ्यायला कमी पडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. राजू गोरे, माजी नगरसेवक अशोक शेडगे, हणमंत चवरे, जगन्नाथ जानकर आदींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.खरं सांगा पुढाºयांनो वचनं तुम्ही पाळली किती?राज्यकर्त्यांनी गेल्या ७० वर्षांच्या काळात धनगर समाजाची फसवणूकच केली. अनेकदा आश्वासने देण्यात आली; पण ती पाळली नाहीत. त्यामुळे खरं सांगा पुढाºयांनो वचनं तुम्ही पाळली किती?, असा उद्विग्न सवालही यावेळी विचारण्यात आला.तंटा समितीचं काही देणं-घेणं नाहीराज्य शासनाने तंटा समिती नेमल्याचे सांगण्यात येते. मात्र त्या समितीशी आम्हाला काही देणं-घेणं नाही. समाजाच्या हक्काचं आरक्षण सर्वांना मान्य अहे. ते शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

धनगर या समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्यात आलं होतं. मात्र ‘धनगड’ या शब्दामुळे या संपूर्ण समाजाची फसवणूक करण्यात आली. आदिवासी लोकांचे २५ आमदार निवडून येतात, आम्हाला तेच आरक्षण दिलं असतं तर आमचेही लोक संसदेत गेले असते. या समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तत्काळ जाहीर करावं, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.- टी. आर. गारळे, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंपMorchaमोर्चा