वाघोली-अंबवडे रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:28+5:302021-06-26T04:26:28+5:30

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील भागातून जाणाऱ्या खंडाळा-कोरेगाव-रहिमतपूर-कऱ्हाड या मार्गावरील वाघोली ते आंबवडे संमत वाघोली रस्त्याची दुरवस्था झाली ...

Demand for repair of Wagholi-Ambawade road | वाघोली-अंबवडे रस्ता दुरुस्तीची मागणी

वाघोली-अंबवडे रस्ता दुरुस्तीची मागणी

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील उत्तरेकडील भागातून जाणाऱ्या खंडाळा-कोरेगाव-रहिमतपूर-कऱ्हाड या मार्गावरील वाघोली ते आंबवडे संमत वाघोली रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधित रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी, याबाबतचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.

तालुक्याच्या उत्तरेकडील परिसरातून जाणारा राज्यमार्ग १४२ खंडाळा-कोरेगाव-रहिमतपूर-कऱ्हाड हा दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, खंडाळा,वाई येथील औद्योगिक महामार्ग, वाठार स्टेशन येथील रेल्वे थांबा आदी बाबींमुळे या मार्गावरून वाहनांची कायम रहदारी असते; परंतु या मार्गावरील वाघोली ते अंबवडे संमत वाघोली यादरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाला सूचना करून त्वरित रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे.

Web Title: Demand for repair of Wagholi-Ambawade road