चार डाॅक्टरांना पुन्हा रुजू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:40+5:302021-04-04T04:40:40+5:30
सातारा : जिल्हा कोविड रुग्णालयातील चार डाॅक्टरांना अचानक कामावरून कमी केले होते. सध्या कोविडचा संसर्ग पुन्हा सुरू झाल्याने या ...

चार डाॅक्टरांना पुन्हा रुजू करण्याची मागणी
सातारा : जिल्हा कोविड रुग्णालयातील चार डाॅक्टरांना अचानक कामावरून कमी केले होते. सध्या कोविडचा संसर्ग पुन्हा सुरू झाल्याने या डाॅक्टरांना पुन्हा त्वरित कामावर घ्यावे अन्यथा मेडिकल स्टुडंट वेलफेअरच असोसिएशनतर्फे बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून देण्यात आला आहे.
या निवदेनात म्हटले आहे की, सातारा जिल्हा कोविड रुग्णालय डेडिकेट हाॅस्पिटल रुबी ए लीकेअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी जानेवारी २०२१मध्ये रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टरांना कोणतेही कारण न देता कामावरून कमी केले आहे. संबंधित डाॅक्टरांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले. मात्र, अद्याप यावर निर्णय झाला नाही. गतवर्षी संबंधित डाॅक्टरांनी कोविड सेंटरमध्ये चांगले काम केले आहे. मात्र, अचानक त्यांना कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ कोविड रुग्णालयात कामावर हजर करून घ्यावे. संबंधित डाॅक्टरांना कामावर रुजू करून न घेतल्यास सातारा जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील डाॅक्टर बेमुदत संपावर जातील. संपामुळे कोणत्याही प्रकारची रुग्णसेवा खंडित झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील.